शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील जटा निर्मूलनाची ‘शंभरी ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 16:23 IST

गेल्या चार वर्षांपासून नंदिनी जाधव यांच्या प्रयत्नातून ही जट निर्मूलनाची मोहीम सुरू आहे...

पुणे : दोन वर्षांपूर्वी डोक्यामध्ये गुंता झाला होता. त्यातून जट वाढत गेली. ही जट काढली तर कुटुंबावर काहीतरी अनिष्ट ओढवेल अशी भीती घालण्यात आली होती.  पण जट असतानाही पतीचे निधन झाले. त्यातून जट आणि इतर बाबींचा काहीही संबंध नाही, हे कळल्यामुळे जट काढण्याचा निर्णय घेतला. आता डोकं  हलके  झाल्यासारखे वाटतंय..या भावना आहेत, भोर येथे वास्तवास असलेल्या जनाबाई तारू यांच्या. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी तारू यांची जट कापून जिल्हयातील जट निर्मूलनाची शंभरी गाठली.      गेल्या चार वर्षांपासून नंदिनी जाधव यांच्या प्रयत्नातून ही जट निर्मूलनाची मोहीम सुरू आहे. जाधव यांनी राज्यातील सुमारे 108 महिलांची जटेतून मुक्तत्ता केली आहे.  जिल्ह्यातील हा आकडा शंभरावर पोचला आहे. यासंदर्भात जाधव म्हणाल्या, जट काढली तर कुटुंबातील व्यक्तींवर वाईट प्रसंग येईल, अशी भीती तारू यांना दाखविण्यात आली. गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्या केसांतील ही सुमारे अर्धा किलो वजनाची जट त्यांनी आजवर काढली नव्हती. मात्र आम्ही गेल्या काही दिवसांपासून तारू यांचे समुपदेशन करीत होतो. जट असताना देखील त्यांच्या पतीचे एका महिन्यापूर्वी निधन झाले. त्यामुळे जट आणि इतर कोणत्या बाबींचा संबंध नाही, असे त्यांना वाटू लागले. आम्ही देखील त्यांची भीती कमी केली. त्यातून त्या जट काढण्यास तयार झाल्या'.     दोन वर्षांपासून डोक्यावर बाळगलेले हे ओझे उतरल्याचा आनंद तारू यांच्या चेह-यावर दिसत होता. त्या  म्हणाल्या, ही जट देवीची आहे. ती काढू नकोस, असे मला अनेकांनी सांगितले. त्यामुळे जट काढायला मला भीती वाटायची. नंदिनी जाधव जट काढण्याचे काम करीत असल्याचे मला वृत्तपत्रांच्या माध्यमातून समजले आणि मी त्यांच्याशी संपर्क केला. अखेरीस त्यांच्या मदतीने माझी जट काढण्यात आली.  माझ्याप्रमाणे इतर महिलांनी देखील जट काढावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.   

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती