शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

सिंहगड रस्त्यावरील 'कोविड केअर सेंटर' ची केंद्रीय पथकाकडून पाहणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 14:52 IST

सध्या या ठिकाणी ११ कोरोना बाधित रुग्ण असून ३० जणांना 'विलगीकरण कक्षा'त ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देवडगांव खुर्द येथील महापालिकेच्या लायगुडे दवाखान्यास दिली भेट 

पुणे : शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. रोज पन्नास ते सत्तरच्या दरम्यान नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच शहर सील करण्यात आले असून २७ एप्रिलपर्यंत अगदी काटेकोरपणे संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच प्रशासनाकडून देखील शहरातील रुग्णालयात असणाऱ्या वैद्यकीय यंत्रणांबाबत देखील तितकीच पुरेसी काळजी घेतली जात आहे. कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे.त्याचधर्तीवर केंद्रीय पथकाकडून वडगाव खुर्द येथील राजयोग सोसायटी परिसरात असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडे दवाखान्याची पाहणी आज (दि. २१) करण्यात आली. यावेळी महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, लायगुडे दवाखान्याच्या डॉ. शुभांगी शाह, औषध निर्माण अधिकारी कल्पेश घोलप उपस्थित होते.   कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुरुवातीला येथे 'विलगीकरण कक्ष' स्थापन केला. परदेशातून आलेले अथवा दिल्लीवरून आलेल्या संशयितांना १४ दिवसांसाठी ठेवण्यात येत  होते. सध्या वाढते रुग्ण लक्षात घेता या ठिकाणी कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी संशयित रुग्णांच्या घशाचा द्राव (स्वॅब) घेऊन चाचणीही केली जाते. सध्या या ठिकाणी ११ कोरोना बाधित रुग्ण असून ३० जणांना 'विलगीकरण कक्षा'त ठेवण्यात आले आहे. दोन बेडच्या मध्ये किती अंतर ठेवण्यात येते, तसेच कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्याच्यावर कोणत्या पद्धतीने उपचार करण्यात येतात, निगेटिव्ह रुग्ण आल्यास काय करता, दवाखान्यात किती बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, आदी प्रश्नाबाबत केंद्रीय पथकाने माहिती घेतली.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका