शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारचे साखरेचे पॅकेज फसवे : हर्षवर्धन पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 20:24 IST

साखर उत्पादनाचा देश व राज्यपातळीवरील अंदाज चुकल्याने साखरेचे भाव खाली आले आहेत.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने ८० लाख टन साखर निर्यात करावी.शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यास अडचणी कायम

पुणे : केंद्र सरकारने जाहीर केलेले ८ हजार ५०० कोटी रूपयांचे पॅकेज फसवे आहे. ही रक्कम ४ हजार ४७ कोटी रुपयांची असताना त्याचे वेगवेगळे आकडे जाहीर करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यास अडचणी कायम आहे. पुढील गाळप हंंगाम घेणे कारखान्यांना अडचणीचे असून केंद्रसरकारने वाढीव पॅकेज द्यावे अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी करताना साखरे बाबतचे सरकारचे धोरणच चुकीचे आहे अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.  राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांना किफायतशीर आणि रास्त दरापोटी (एफआरपी) अजूनही १८०० कोटी रुपये दिलेले नाही. इथेनॉलचा ४० रूपयांचा प्रति लिटरचा दर वाढवून ५३ रुपये करावा. तसेच साखरेचा प्रतिक्विंटलमागे निर्धारित केलेला भाव २९०० रुपयांवरुन ३ हजार २०० रुपये करावा अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली. साखर उद्योग अडचणीत असताना पाकिस्तानातून ३ लाख मेट्रीक टन साखर आयात करण्यात आली असून परदेशातून २१ लाख मेट्रीक टन कच्ची साखर आयात झाली आहे. ही कच्ची साखर प्रक्रिया करून बाहेर जाणे अपेक्षित होते. मात्र देशांंतर्गत बाजारातच तिची विक्री झाल्यामुळेच साखरेचे भाव पडले असल्याचे ते म्हणाले.  पाटील म्हणाले, साखर उत्पादनाचा देश व राज्यपातळीवरील अंदाज चुकल्याने साखरेचे भाव खाली आले आहेत. यंदाच्या हंगामात २६० लाख मेट्रीक टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ३२७ लाख टन उत्पादन झाले आहे. राज्यातही ७२ ते ७६ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. प्रत्यक्षात १०७ लाख मेट्रीक टन उत्पादन झाले. वाढलेल्या उत्पादनामुळे साखरेच्या भावात भाव घट झाली. त्यामुळे उसाची एफआरपी द्यायची कशी असा प्रश्न आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ८० लाख टन साखर निर्यात करावी. त्यासाठी दिलेले प्रति टन अनुदान ५५ रुपयांऐवजी शंभर रुपये करावे. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकारcongressकाँग्रेस