केंद्र सरकारने द्यावे रिक्षांवरील कर्जाचे व्याज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST2021-02-05T05:01:24+5:302021-02-05T05:01:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: मद्य उत्पादनासाठी लागणारे इथेनॉल तयार करण्यासाठी केंद्र सरकार देशभरातील साखर कारखान्यांना ४ हजार ५७३ कोटी ...

केंद्र सरकारने द्यावे रिक्षांवरील कर्जाचे व्याज
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: मद्य उत्पादनासाठी लागणारे इथेनॉल तयार करण्यासाठी केंद्र सरकार देशभरातील साखर कारखान्यांना ४ हजार ५७३ कोटी रुपयांचे व्याज देत आहे. त्याऐवजी कोरोना टाळेबंदीत व्यवसाय मोडल्याने हलाखीत आलेल्या देशातील रिक्षाचालकांना त्यांच्या रिक्षावरील कर्जाचे व्याज सरकारने द्यावे अशी मागणी आम आदमी पार्टी (आप) रिक्षा संघटनेने केली आहे.
या मदतीच्या ४ हजार ५७३ कोटी रुपयांमध्ये देशभरातील २१ लाख ७७ हजार ६१९ रिक्षाचालकांचे त्यांच्या रिक्षावरील व्याज पूर्ण होऊन त्यांच्या रिक्षा कर्जमुक्त होऊ शकतात असे आप रिक्षा संघटनेचे म्हणणे आहे. रिक्षाचालकांना केंद्र सरकारने मदत करावी किंवा राज्य सरकारांना त्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी करणारे निवेदन संघटनेच्या वतीने अध्यक्ष असगर बेग, सरचिटणीस श्रीकांत आचार्य, गणेश ढमाले, आनंद अंकुश, केदार ढमाले आदींनी केंद्र व राज्य सरकारला पाठवले आहे.