शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गळ्यात कांद्याच्या माळा घालून केंद्र सरकारचा निषेध; खेड तालुक्यात शिवसैनिक आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 23:06 IST

भाजप सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आंदोलन

राजगुरुनगर: केंद्र सरकारनेकांदा निर्यात बंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळेच या निर्णयाच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने व निषेध नोंदवला जात आहे. तसेच सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर खेड तालुका शिवसेनेच्या वतीने गळ्यात कांद्याच्या माळा घालून केंद्र सरकारचा निषेध करून व कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी तहसीलदार कचेरीसमोर आंदोलन केले.        लॉकडाऊनच्या काळात कवडीमोल भावाने आपला शेतमाल विकावा लागलेल्या शेतकऱ्यांना ह्या आठवड्यात कांद्याला ३ हजार ते ४ हजारपर्यंत उच्चांकी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी समाधानी होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे. या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार खेड तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने कांद्यावरील बंदी ताबडतोब हटवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. कांदा निर्यात बंदी तात्काळ न उठल्यास कोरोनाच्या गंभीर परिस्थितीही ही पुन्हा पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षा व शिवसेनेच्या नेत्या विजयाताई शिंदे, जिल्हा सल्लागार प्रकाश वाडेकर पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे उपसभापती ज्योती आरगडे, भगवान पोखरकर, पंचायत समिती सदस्या सुनिता सांडभोर, सुरेश चव्हाण,नंदा कड, किरण गवारे, बापुसाहेब थिटे, लक्ष्मण जाधव,एल, बी तनपुरे, पांडुरंग गोरे. दिलिप तापकिर, यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनचे कार्यकत्ये उपस्थित होते. दरम्यान नायब तहसिलदार राजेश कानसकर यांना निवेदन तालुका शिवसेनेच्या वतीने देण्यात आले.

टॅग्स :KhedखेडShiv SenaशिवसेनाCentral Governmentकेंद्र सरकारonionकांदाFarmerशेतकरी