शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत 'कोविड-१९' चाचणीला केंद्र शासनाची मान्यता; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घातले होते लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 18:21 IST

बारामती शहरात वैद्यकीय महाविद्यालयात प्रयोगशाळा उद्यापासुन होणार कार्यान्वित

ठळक मुद्देप्रयोगशाळेला मान्यता मिळाल्याने आता कोविड १९चे बारामतीमध्येच निदान होणार बारामती येथील संशयित रुग्णांना पुणे येथील तपासणी यंत्रणेवर लागत होते अवलंबुनआता रुग्णांना १५ ते २० तासांमध्ये कोरोना तपासणीचा अहवाल दिला जाईल.

बारामती : बारामती शहरातील  कोविड-१९  चाचणीला केंद्र शासनाने  मान्यता दिली आहे.त्यानुसारबारामती शहरात वैद्यकीय महाविद्यालयात उभारलेली प्रयोगशाळा उद्यापासुन होणार कार्यान्वित होणार आहे.याबाबत वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संजीवकुमार तांबे यांनी माहिती दिली. प्रयोगशाळेला मान्यता मिळाल्याने आता कोविड १९ चे बारामतीमध्येच निदान होणार आहे.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभुमीवर राज्यात बारामतीसह सहा ठिकाणी कोविड-१९ तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल)सुरु करण्यास राज्य शासनाने १६ एप्रिल रोजी  मान्यता दिली. त्यानुसार आता शहरातील कोरोना संशयिताच्या तपासणीसाठी शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.या प्रयोगशाळेची नागपुर येथील  अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या डॉ. मिना मिश्रा यांनी पाहणी केली होती.या पाहणीनंतर मिश्रा यांनी या प्रयोगशाळेत कोविड १९ च्या तपासणीसाठी आवश्यक योग्य सुविधा असल्याचा अहवाल दिला आहे.तसेच बारामतीत कोविड-१९  चाचणी केंद्र शासनाने  मान्यता दिल्याचे कळविले आहे.त्यामुळे बारामती शहरात वैद्यकीय महाविद्यालयात प्रयोगशाळा उद्यापासुन होणार कार्यान्वित होणार आहे.

 बारामती येथील संशयित रुग्णांना पुणे येथील तपासणी यंत्रणेवर अवलंबुन राहावे लागत होते .पुणे येथे संशयित रुग्ण नेणे—आणणे,तपासणीची प्रक्रिया वेळखाऊ आहे.त्यामुळे बारामती येथे संबंधित प्रयोगशाळा लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी होती . ही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्याने पूर्ण झाली आहे.याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीवकुमार तांबे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आलेली कोविड १९ ची तपासणी प्रयोगशाळा गुरूवार (दि. २८) पासून कार्यान्वित होणार आहे. याची पूर्ण तयारी झाली असून याबाबत केंद्र सरकारची मंजुरी देखील मिळाली आहे. त्यामुळे उद्यापासून कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कातील ल तसेच कोरोना संशयितांचे स्वॅब रूई येथील कोविड रुग्णालयात घेतले जातील.त्यानंतर ते स्वॅब वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत तपासली जातील.त्यामुळे आता रुग्णांना १५ ते २० तासांमध्ये कोरोना तपासणीचा अहवाल दिला जाईल.

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCentral Governmentकेंद्र सरकार