शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोला केंद्राकडून मंजुरी, हिंजवडी ते शिवाजीनगर प्रकल्पाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 04:02 IST

पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पास केंद्राकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी दोन महिन्यांत या प्रकल्पाची अंतिम टप्प्यातील निविदा प्रक्रिया सुरू करून मेट्रोच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात केली जाईल, असे पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.

पुणे : पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पास केंद्र शासनाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो धावण्यचा मार्ग मोकळा झाला आहे.परिणामी पुढील दोन महिन्यांत या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू करून मेट्रोच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल, असे पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांच्या सार्वजनिक प्रवासाचा प्रश्न सुटावा, या उद्देशाने पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर २३.३ किमीचा मेट्रो प्रकल्प राबविला जात आहे. पब्लिक प्राव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर राबविल्या जाणाºया पीएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाकडूनही मंजुरी मिळाली होती. केंद्र शासनाकडून सुमारे १ हजार ३०० कोटी रुपये मिळावेत, यासाठी पीएमआरडीएने केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून केंद्राच्या समितीकडून त्यात सातत्याने त्रुटी दाखविल्या जात होत्या. अखेर पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते बुधवारी (दि. ७) स्वत: दिल्लीत जाऊन केंद्रीय समितीबरोबर चर्चा केली. सविस्तर चर्चेनंतर पीएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पास मान्यता देण्यात आली. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेबरोबरच पीएमआरडीएची मेट्रोही सेवेसाठी दाखल होईल.पीएमआरडीएच्या मेट्रो प्रकल्पाला ८ हजार ३१३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यातील केंद्र सरकारने वीस टक्के निधीला मान्यता दिली आहे. केंद्राच्या निधीबरोबरच उर्वरित निधी प्राधिकरणाला स्वत:कडील जमिनींच्या विकासातून उभा करावा लागणार आहे. पीएमआरडीएची मेट्रो हिंजवडी, वाकड, बालेवाडी, सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठ या मार्गावरून मार्गस्थ होईल. तसेच शिवाजीनगर येथे ही मेट्रो मार्गिका शहराच्या उर्वरित मेट्रो मार्गिकांना जोडली जाणार आहे.दरम्यान, टाटा रिएल्टी - सिमेन्स, आयएलएफएस आणि आयआरबी या तीन कंपन्या पात्र ठरल्या आहेत. प्रकल्पासाठी हिंजवडीजवळील माण गावामध्ये पन्नास एकर जागेवर मेट्रोचा कार डेपो उभारण्यात येणार आहे. या मेट्रो प्रकल्पामुळे हिंजवडी येथील माहिती व तंत्रज्ञान औद्योगिक क्षेत्र पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांना जोडली जाणार आहेत.

केंद्राकडून सुमारे १ हजार ३०० कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित होते. हा निधी मिळत नाही तोपर्यंत मेट्रोच्या अंतिम निविदेचे काम करता येत नव्हते. मात्र, आता केंद्राकडून हा निधी मिळण्यास मान्यता दिली आहे. केंद्राच्या मंजुरीमुळे मेट्रो प्रकल्प कार्यान्वित करण्याचे काम खासगी आॅपरेटरकडे दिले जाईल. तसेच मेट्रोसाठी प्राप्त झालेल्या तीन खासगी कंपन्यांच्या निविदा तपासल्या जातील. पुढील दोन महिन्यांत सर्व कायदेशीर बाबी व नियमांच्या आधीन राहून एका कंपनीला मेट्रोचे काम दिले जाईल.- किरण गित्ते

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे