शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जनगणनेची रंगीत तालीम 'ऑगस्ट' मध्ये : यंदा प्रथमच होणार माहितीचे ऑनलाईन संकलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 13:03 IST

देशाच्या अगामी जनगणना मोहिमेची रंगीत तालीम येत्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात निवडक जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात होणार आहे.

ठळक मुद्देयंदा प्रथमच जनगणनेची माहिती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार

पुणे : देशाच्या अगामी जनगणना मोहीमेची रंगीत तालीम येत्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात निवडक जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात होणार आहे. यंदा प्रथमच जनगणनेची माहिती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्याचे राज्यस्तरीय प्रशिक्षण यशदा येथे नुकतेच संपन्न झाले. दर दहा वर्षांनी होणारी देशाची जनगणना २०२१ साली होत आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी देशाच्या महारजिट्रार तथा जनगणना आयुक्त कार्यालयाच्या वतीने देशभरात प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येत आहे. या मोहीमेची रंगीत तालीम देशभरातील निवडक जिल्ह्यात घेतली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशिक्षकांचे प्रशिक्षण ३ ते ११ जून दरम्यान यशदा येथे घेण्यात आले. जनगणना आयुक्त विवेक जोशी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप झाला. तर, प्रशिक्षणाचे उद्घाटन राज्याच्या जनगणना संचालक रश्मी झगडे यांच्या हस्ते झाले. मे महिन्यात राष्ट्रीय पातळीवरील शिबीर नवी दिल्ली येथे झाले होते. यातील प्रशिक्षकांनी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि गोवा राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षित केले. आता हे प्रशिक्षक पुढील टप्प्यात जिल्हास्तरीय प्रशिक्षकांना प्रशिक्षित करतील. या रंगीत तालमीतून जनगणनेची प्रश्नावली, सूचना पुस्तिका, माहिती संकलनाची पद्धती आणि माहिती संस्करणाची पद्धती सुनिश्चित करणे शक्य होणार आहे. या मोहिमेविषयी बोलताना जनगणना आयुक्त जोशी म्हणाले, जनगणना २०२१साठी रंगीत तालीम हा महत्त्वाचा टप्पा आहे. यंदा पहिल्यांदाच माहितीचे संकलन ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे प्रस्तावित आहे. त्याची चाचणी दरम्यान केली जाईल. माहितीचे संकलन ऑनलाईन झाल्यास सरकारी धोरण ठरविण्यासाठी आणि संशोधकांना आवश्यक माहिती तातडीने उपलब्ध होऊ शकते. ---------------

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारonlineऑनलाइन