शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉर बोर्डच्या नोंदीचा खजिना संकेतस्थळावर खुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 00:55 IST

एनएफएआय : स्वातंत्र्यपूर्व काळातील सेन्सॉर बोर्डच्या नोंदी

पुणे : हे माहीत आहे का? की डेक्कन पिक्चर्स कॉर्पोरेशनने १९२४ मध्ये ‘पुण्यावर हल्ला’ हा मूकपट निर्मित केला होता आणि त्याचे दिग्दर्शन मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध नाटककार मामा वरेरकर यांनी केले होते. त्यात मोगल सेनापती शाहिस्तेखान हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करायला जातो, तेव्हा शाहिस्तेखानाला शिवाजी महाराजांच्या कपाळावर चंद्रकोर दिसते. शिवाजी महाराजांना शैतान कसं म्हणू शकतो? हा तर शिवाचा अवतार आहे अशा शब्दांत शिवाजी महाराजांची मुक्तकंठाने प्रशंसा करणारा प्रसंग वरेरकरांनी या चित्रपटात समाविष्ट केला होता; मात्र भारतीय स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर साम्राज्यशाहीविरुद्धातील हे रूपक असल्याचे मानून बॉम्बे बोर्ड आॅफ सेन्सॉरने हा प्रसंग वगळून १५ आॅगस्ट १९२४ला डेक्कन पिक्चर्स कॉर्पोरेशनला सेन्सॉरचे प्रमाणपत्र दिले होते... अशा सेन्सॉर बोर्डाच्या जवळपास २५०० पानांच्या नोंदीचा दुर्मिळ खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने अभ्यासक आणि संशोधकांसाठी संकेतस्थळावर खुला केला आहे.

दिवंगत सिसिल बी. डी. मिले यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द व्होल्गा बोटमन’ या अमेरिकन मूकपटाला देखील सेन्सॉरने कात्री लावली होती. रशियातील बोल्शेव्हिक क्रांतीशी संबंधित हा चित्रपट असून, तो वर्णद्वेष, हिंसाचार, लालसा आणि विश्वासघात अशा गोष्टींना खतपाणी घालणारा असल्याने बॉम्बे बोर्ड आॅफ सेन्सॉरने या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यास नकार दर्शविला होता. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय चित्रपटसृष्टीशी संबंधित अशा अनेक गोष्टी संशोधकांना उपलब्ध होणार असल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली.तब्बल २५०० पानांच्या नोंदी४१९२० ते १९५० दरम्यान बॉम्बे आणि बंगाल सरकारच्या राजपत्रामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय चित्रपटसृष्टीशी संबंधित नोंदींचा उल्लेख देखील पाहायला मिळतो.४चित्रपट पूर्ण झाल्यानंतर, सेन्सॉर बोर्डाकडे तपासणी आणि सर्टिफिकेटसाठी पाठविण्यात आलेल्या जवळपास या २५०० पानांच्या नोंदी एनएफएआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये चित्रपट तपासणी, रिळांची संख्या, कंपनीचे नाव, मूळचा देश, तपासणीसाठी आणि सर्टिफिकेट दिल्याची तारीख या माहितीचा नोंदीमध्ये समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.‘स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय चित्रपट आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित या नोंदी म्हणजे, एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. ज्यांना स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय चित्रपटांमध्ये रस आहे, अशा जगभरातील चित्रपट संशोधकांना हा माहितीचा खजिना उपयुक्त ठरणार आहे.- प्रकाश मगदूम, संचालक, एनएफएआय

टॅग्स :Puneपुणेonlineऑनलाइन