बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:10 IST2020-12-02T04:10:26+5:302020-12-02T04:10:26+5:30
बाळासाहेब मदने (वय ३०, रा. खराडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी ...

बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी कोठडी
बाळासाहेब मदने (वय ३०, रा. खराडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी खराडी परिसरात ही घटना घडली.
मदने हा चार चाकीमध्ये एक गावठी पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे असा एकूण २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल बेकायदा जवळ बाळगून असताना पोलिसांना मिळून आला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी मदने याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील अन्य आरोपीला अटक करण्यासाठी तसेच हे पिस्तुल आणि काडतुसे त्याने कोठून आणली, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का, याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. ती मान्य केली.