‘लोकमत’ दौंड कार्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

By Admin | Updated: February 10, 2015 01:17 IST2015-02-10T01:17:28+5:302015-02-10T01:17:28+5:30

‘लोकमत’च्या दौंड कार्यालयाचा वर्धापन दिन सोमवारी उत्साहात साजरा झाला. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार आणि वैद्यकीय क्षेत्रांसह

Celebration of 'Lokmat' Daund Office celebrates anniversary | ‘लोकमत’ दौंड कार्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

‘लोकमत’ दौंड कार्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

दौंड : ‘लोकमत’च्या दौंड कार्यालयाचा वर्धापन दिन सोमवारी उत्साहात साजरा झाला. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार आणि वैद्यकीय क्षेत्रांसह वाचकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यानिमित्त ‘विशेष पुरवणी’चे प्रकाशन दौंडच्या माजी आमदार रंजना कुल, दौंडच्या नगराध्यक्षा अंकुशाबाई शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, तहसीलदार उत्तमराव दिघे, दौंड राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दौंड तालुकाप्रमुख दत्ताजी शिणोलीकर, बंजारा सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांच्या हस्ते झाले. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी मान्यवरांचे
स्वागत केले.

 

Web Title: Celebration of 'Lokmat' Daund Office celebrates anniversary