शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Deccan Queen | पुण्यात 'डेक्कन क्वीन'चा 93 वा वाढदिवस उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 12:40 IST

डेक्कन क्वीनचा वाढदिवस केक कापून साजरा

पुणे : पुणे आणि मुंबईदरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीनचा आज 93 वा वाढदिवस आहे. डेक्कन क्वीन ही रेल्वे सुरू होऊऩ आज तब्बल 93 वर्षे पूर्ण झाली. त्याच्याच मुहूर्तावर पुण्यात डेक्कन क्वीनचा वाढदिवस प्रवाशांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

मुंबई मार्गावरील सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय डेक्कन क्वीन या  रेल्वे गेल्या 93 वर्षांपासून सेवा देत आहे. यामुळेच  आज पुणे स्टेशनवर या गाडीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पुणेकर प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन आज 93 वर्षांची झाल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले. 1 जून 1930 रोजी ही गाडी पहिल्यांदा धावली होती.

पुणे - मुंबई प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी ही गाडी अत्यंत आवडीची आणि सोईची आहे. या गाडीसोबत प्रवाशांच अनोखं नातं गेल्या अनेक वर्षांपासून आहे. याच कारणाने 'डेक्कन क्विन' एक्सप्रेसचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

93 व्या वाढदिवसानिमित्ताने गाडी छान सजवण्यात आली होती. डेक्कन क्वीनचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

डेक्कन क्वीन अर्थात दक्खनची राणीही प्रसिद्ध आणि प्रवाशांच्या प्रथम पसंतीची रेल्वेगाडी आहे. डेक्कन क्वीनला आज ९२ वर्षे पूर्ण करून आज ९३ व्या वर्षात पदार्पण केले. या गाडीत काळानुसार बद्दल करण्यात आले, डब्यांची संख्या वाढविण्यात आली. देशातील पहिली डायनिंग कार सुविधा असलेली ही एकमेव रेल्वे गाडी आहे.

- अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे