जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST2021-03-09T04:12:30+5:302021-03-09T04:12:30+5:30
पुणे शहर युवक काँग्रेस जागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग क्रमांक ३९, ४० मधील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या तसेच महापालिकेत सेवा ...

जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
पुणे शहर युवक काँग्रेस
जागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग क्रमांक ३९, ४० मधील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या तसेच महापालिकेत सेवा करणाऱ्या महिलांना साडी देऊन सन्मान केला. या वेळी सरचिटणीस नीलेश सांगळे, सौरभ शिंदे, सौरभ अमराळे, गणेश गुगळे, अर्चना शहा, विनोद कोंढरे, सुनीता हिवरकर उपस्थित होते.
रोटरी क्लब पुणे इस्ट
चंदखेड येथे ग्रामस्थ महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी ७० महिलांना सहभागी झाल्या. जया शाह, डॉ. संपदा जोशी, डॉ. अमृत ओसवाल, नेहा उपासनी, नरेंद्र शाह, विजय शाह, शुभदा शाह उपस्थित होते.
--
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
काँगेसभवन येथे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, ॲड. निलीमा वर्तक, लेखिका सुनेत्राराजे पवार, डॉ. मनीषा छाजेड, चैत्राली चांदेरकर, सुहानी पवार, पोलीस निरीक्षक क्रांती पवार, अलका गुजनाळ आदी महिलांचा सन्मान केला. या वेळी माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे अभय जोशी, कमल व्यवहारे, दीप्ती चौधरी, संगीता तिवारी, नीता राजपूत, रजनी त्रिभुवन, नगरसेविका चाँदबी नदाफ, पूजा आनंद, अविनाश बागवे, शिवा मंत्री, सचिन आडेकर उपस्थित होते.
---
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे कॅन्टोन्मेंट
ताडीवाला येथील पंचशील चौक येथे ५० सफाई महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. यावेळी माजी आमदार जयदेव गायकवाड यांच्या हस्ते महिलांना संविधान प्रत, मिठाई देवून सन्मानित केले. यावेळी नगरसेवक प्रदीप गायकवाड, लता राजगुरू, चाँदबी नदाफ, रजनी त्रिभुवन, मीना पवार, स्मिता वाघमारे, सुजित यादव, शाम गायकवाड उपस्थित होते.
--
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक ४ मधील सावित्रीबाई फुले दवाखान्यातील डॉक्टर व परिचारिकांचा सन्मान केला. कसबा मतदार संघाच्या अध्यक्षा निता समीर पालवे, समीर पालवे यांनी आयोजन केले.