वाड्यातील शाळा महाविद्यालयात शिक्षकदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:13 IST2021-09-07T04:13:17+5:302021-09-07T04:13:17+5:30

प्रथम प्राचार्य शिवाजी दुंडे,पर्यवेक्षक सतिष हाके व रत्नप्रभा शितोळे यांनी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. इयत्ता दहावी ...

Celebrate Teacher's Day at the school college in the castle | वाड्यातील शाळा महाविद्यालयात शिक्षकदिन साजरा

वाड्यातील शाळा महाविद्यालयात शिक्षकदिन साजरा

प्रथम प्राचार्य शिवाजी दुंडे,पर्यवेक्षक सतिष हाके व रत्नप्रभा शितोळे यांनी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला. सर्व गुरुजनांना गुलाब पुष्प व छोटीशी भेट देऊन गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. दिवसभर शिक्षकांना येणारे अनुभव प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना मिळाले. वर्गातील विद्यार्थ्यांनी अध्यापन करताना कोरडा पडणारा घसा, खडूने पांढरे होणारे हात या गोष्टींचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.

सकाळी १०वाजता विद्यार्थी नटूनथटून शाळेच्या आवारात उपस्थित होते. प्राचार्य म्हणून आदित्य वाळुंज, मुख्याध्यापक म्हणून जय मिडगुले तर पर्यवेक्षक म्हणून यश गोपाळे यांनी काम पाहिले. दिवसभर आलेले अनुभव विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून व्यक्त केले. या वेळी ओंकार डोंगरे व आशिष कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्या हुंडारे व गायत्री कोरडे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Celebrate Teacher's Day at the school college in the castle