शिक्षकांना सन्मानित करून शिक्षक दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:13 IST2021-09-06T04:13:40+5:302021-09-06T04:13:40+5:30
पिरंगुट : मुळशी तालुक्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करणारे हे पेरिविंकल स्कूल म्हणजे शिक्षणाच्या माहेरघराचे वैभवच होय, असे मत ...

शिक्षकांना सन्मानित करून शिक्षक दिन उत्साहात साजरा
पिरंगुट : मुळशी तालुक्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करणारे हे पेरिविंकल स्कूल म्हणजे शिक्षणाच्या माहेरघराचे वैभवच होय, असे मत पुणे मनपाचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक दीपक मानकर यांनी व्यक्त केले.
पेरिविंकल स्कूलमध्ये शिक्षकदिनाच्या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या बावधन,सूस,पिरंगुट व पौड या चारही शाखांमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सर्व शिक्षकांचा गौरव करीत त्यांना भेटवस्तू देण्यात आली.तर याच कार्यक्रमादरम्यान मुळशी तालुक्यातील पत्रकारांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान देखील करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन बावधन येथील पेरिविंकल स्कूलमध्ये करण्यात आले होते.तेव्हा पुणे शहराचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक दीपक मानकर,नगरसेविका स्वप्नाली सायकर,बावधनच्या सरपंच पियुशा दगडे पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, माजी सरपंच गणेश दगडे यांच्या हस्ते सर्व प्रथम सरस्वतीमाता व सर्वमल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करीत या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
त्यावेळी पत्रकार व लेखक संजय दुधाणे, पत्रकार संघ मुळशीचे अध्यक्ष रमेश ससार, मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझीरे, दीपक सोनवणे, प्रवीण सातव, पप्पू कंधारे, सचिन केदारी, सचिन विटकर, सागर शितोळे, गणेश हूंबे,महेश आल्हाट, बावधन शाखेच्या प्राचार्या नीलिमा व्यवहारे,सूस शाखेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित,पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक अभिजित टकले व कॉलेजच्या रुचीरा खानविलकर, पर्यवेक्षिका रश्मी पाथरकर,शुभा कुलकर्णी,सोनाली देऊसकर,सना इनामदार,पूनम पांढरे,पल्लवी व जिनी नायर आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेमधील त्याचप्रमाणे समाजामधील मुलांना घडविण्याचे मोठे काम खऱ्या अर्थाने हे सर्व शिक्षकवर्गच करीत असल्याचे गौरोद्गार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी आपल्या भाषणा दरम्यान काढले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संचालिका रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे, निर्मल पंडित, रुचिरा खानविलकर यांच्या नेतृत्वतेखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहयोगाने करण्यात आले होते.
पेरिविंकल स्कूलमध्ये शिक्षकदिनाच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षकवर्गाचा सन्मान करण्यात आला.