एमआयटी एडीटी विद्यापीठात शिवजन्मोत्सव व विश्व सूर्यनमस्कार दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:30 IST2021-02-20T04:30:35+5:302021-02-20T04:30:35+5:30
एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष व कुुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, विद्यापीठाचे प्र - कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश ...

एमआयटी एडीटी विद्यापीठात शिवजन्मोत्सव व विश्व सूर्यनमस्कार दिन साजरा
एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष व कुुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, विद्यापीठाचे प्र - कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल डॉ. किशोर रवंदे, लोणी काळभोरचे माजी उपसरपंच प्रशांत काळभोर, कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, चित्तरंजन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते कमलेश काळभोर, सूर्यकांत काळभोर, लोणी काळभोर ग्रामपंचायत सदस्य राहुल काळभोर यांच्यासह एमआयटी सर्व विभागांचे डीन, डायरेक्ट, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव विद्यापीठात उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या भव्य अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. याावेळी जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. यावेळी ढोल-ताशा, हलगीपथक, भगव्या पताका, पारंपरिक बँड, महाराजांच्या पुतळ्याची पालखी हे या मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य होते. दरम्यान यावेळी मिटकॉनच्या संचालिका प्रा. सुनीता मंगेश कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरूचे सल्लागार शिवशरण माळी, डॉ. रमाकांत कपले, डॉ. वसंत पवार, डॉ. राहुल मोरे, कृष्णमूर्ती ठाकूर आदी उपस्थित होते.