सुप्यात शिवजयंती साधेपणाने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:18 IST2021-02-23T04:18:42+5:302021-02-23T04:18:42+5:30
येथील आझाद मैदानावर बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर उत्सव समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते ...

सुप्यात शिवजयंती साधेपणाने साजरी
येथील आझाद मैदानावर बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर उत्सव समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते ' श्री ' ना पुष्पहार घालण्यात आला. या वेळी येथील आवारात भव्य सभामंडप टाकून पुतळ्यासभोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच दर्शनी भागात स्वागत कमान टाकून परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
दुपारच्या दरम्यान येथील भुईकोट किल्ल्यावरून आणलेल्या शिवज्योतीची मुख्य पेठेतून मिरवणूक काढण्यात आली. रात्री आरतीच्या दरम्यान झांज पथकाने उपस्थित शिवप्रेमीचे लक्ष वेधून घेतले.
दरम्यान, बाबुर्डी येथे राजगडावरून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. येथील शिवराय मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुपे येथे शिवजयंतीच्या निमित्ताने सभामंडपात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.