भोर : येथील राजवाडा चौकातील तहसील कार्यालयासमोर उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भोर शहरात व तालुक्यात विविध उपक्रमांसह कोरोना योद्ध्यांचा सन्मान करून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी आमदार संग्राम थोपटे, तहसीलदार अजित पाटील, नायब तहसीलदार मनोहर पाटील, विक्रम खुटवड, भालचंद्र जगताप, नगराध्यक्ष निर्मला आवारे, संतोष घोरपडे, जीवन कोंडे, जगदीश गुजराथी उपस्थित होते. स्वातंत्र्यसैनिक नारायण कारळे यांचा आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या मैदानावर आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव डॉ. भाग्यश्री पाटील, प्राचार्य प्रसन्न देशमुख, प्राचार्य राजकुमार शेटे, प्राचार्य उमेश देशमुख, संदीप उल्हाळकर, पल्लवी मळेकर उपस्थित होते. यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. विविध विभागांत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान थोपटे यांच्या हस्ते करण्यात आला.
भोर नगरपलिकेत नगराध्यक्ष निर्मला आवारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्यधिकारी डाॅ. विजयकुमार थोरात, उपनगराध्यक्ष अनील पवार, गटनेते सचिन हर्णसकर, तृप्ती किरवे, आशा रोमण, सुमंत शेटे, गणेश पवार उपस्थित होते.
भोर पंचायत समितीत सभापती श्रीधर किंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्यासह सर्व सदस्य, कर्मचारी उपस्थित होते. शहरातील विविध शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यासंकुलामध्ये ७१ व्या प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन कोरोनाकाळात कोरोना योध्दा म्हणून काम करणाऱ्या भोर नगरपलिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळामध्ये भोर तालुक्यात दोन हजार १०० ते दोन हजार २०० लोक कोरोनाबाधित असताना मृत्यू झालेल्या लोकांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम भोर न.पा आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले. यामध्ये महादेव बोडके, किसन गुमाणे, संपत साळुंखे, गुलाब जावळेकर, गायकवाड व इतर कर्मचारी होते. त्यांचा कोरोना योद्धे म्हणून सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ व पोशाख देऊन गौरविण्यात आले. यासाठी माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे, गजानन शेटे, रविंद्र गायकवाड यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ.योगेंद्र आगटे यांनी कोरोनाकाळातील प्रसंग सांगितले व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य आर. के. पाटील यांनी केले. ध्वजारोहण कन्या प्रशालेच्या प्राचार्या सौ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी संजय आंबवले, शालेय व्यवस्थापन सदस्या सौ. सुनंदा गायकवाड, शाळेचे माजी विद्यार्थी व श्री छत्रपती शिवाजी विद्यासंकुलातील सर्व सेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सुनील थोपटे यांनी केले व शिंदे यांनी आभार मानले.
२८ भोर प्रजासत्ताक
भोर तहसील कार्यालयात ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना