भांबर्डे येथे ऑनलाइन शिक्षक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:12 IST2021-09-07T04:12:50+5:302021-09-07T04:12:50+5:30

भांबर्डे येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयाचा ऑनलाइन शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी एकूण ...

Celebrate Online Teacher's Day at Bhambarde | भांबर्डे येथे ऑनलाइन शिक्षक दिन साजरा

भांबर्डे येथे ऑनलाइन शिक्षक दिन साजरा

भांबर्डे येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयाचा ऑनलाइन शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी एकूण शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी ऑनलाईन शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. विद्यालयातील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ८ वी आणि ९ वीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने विषय शिकविले.

शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून घडविण्याचे काम करतात, असे प्रतिपादन विद्यार्थी मुख्याध्यापक सूरज शिंदे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थी पर्यवेक्षक प्राजक्ता म्हस्के विद्यालयाचे शिक्षक उत्तम गाडे, सुरेश शेळके, बाळासाहेब दिवेकर, सविता शिंदे तसेच विद्यार्थी शिक्षक म्हणून सानिया फाळके, काजल म्हस्के, करण पवार, अभिषेक मरकड, भारती डांगे, वैष्णवी शिंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रेया पवार, तर धनश्री वीर या विद्यार्थिनीने आभार मानले.

भांबर्डे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ऑनलाईन शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

060921\img-20210906-wa0157.jpg

भांबर्डे येथे ऑनलाईन शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

Web Title: Celebrate Online Teacher's Day at Bhambarde