सुखसागरमध्ये पेढे वाटून आनंद साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:18 IST2021-03-04T04:18:57+5:302021-03-04T04:18:57+5:30

आज दुपारी ३.३० च्या सुमारास लस घेऊन गाडी आली आणि येथे लस घेण्यासाठी जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी टाळ्या वाजवत आरोग्य ...

Celebrate happiness by sharing trees in Sukhsagar | सुखसागरमध्ये पेढे वाटून आनंद साजरा

सुखसागरमध्ये पेढे वाटून आनंद साजरा

आज दुपारी ३.३० च्या सुमारास लस घेऊन गाडी आली आणि येथे लस घेण्यासाठी जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी टाळ्या वाजवत आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. नगरसेवक प्रकाश कदम व युवा नेते प्रतीक कदम यांनी पेढे वाटून या लसीकरण मोहिमेचे स्वागत केले. लस दिल्यानंतर या ज्येष्ठ नागरिकांना अर्धा तास या ठिकाणी बसवण्यात आले. आरोग्य सेवक व सेविका कमी असल्यामुळे अनेक ज्येष्ठांना आपली वेळ येईपर्यत वाट पाहत बसावे लागत होते.

आज १५० नागरिकांना देता येतील एवढे ढोस आज प्राप्त झाले असल्याची माहिती डॉ. वर्षा खेडेकर यांनी ‘लोकमतशी बोलताना दिली. येथे स्टाफ वाढून मिळाला तर ज्येष्ठांना जास्त वेळ या ठिकाणी ताटकळत ठेवावे लागणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले. यावेळी अनेक ज्येष्ठ लसी बाबत व तिच्या सुरक्षेबाबत चर्चा करताना दिसत होते. काही ज्येष्ठ नागरिक लस घेण्यासाठी आपला पहिल्याच दिवशी नंबर लागल्यामुळे आनंदीदेखील होते.

फोटो ओळ : सुखसागर येथील पालिकेच्या मोरे दवाखाण्यात लस देण्यास सुरुवात करण्यात आली.

Web Title: Celebrate happiness by sharing trees in Sukhsagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.