बकरी ईद साजरी करा साधेपणाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:12 IST2021-07-14T04:12:31+5:302021-07-14T04:12:31+5:30

पुणे : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्यातील धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे २१ जुलैला येणारी बकरी ईद साध्या पध्दतीने साजरी ...

Celebrate Goat Eid simply | बकरी ईद साजरी करा साधेपणाने

बकरी ईद साजरी करा साधेपणाने

पुणे : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्यातील धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे २१ जुलैला येणारी बकरी ईद साध्या पध्दतीने साजरी करण्याचा आदेश पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे.

या आदेशानुसार, बकरी ईदची नमाज मशिद अथवा ईदगाह तसेच सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहणार असून नागरिकांनी जनावरे खरेदीचे व्यवहार ऑनलाईन अथवा दूरध्वनीवरून करावेत. शक्यतो नागरिकांनी प्रतिकात्मक कुर्बानी करावी असे आवाहन महापालिकेने केले आहे़

बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये अथवा एकत्र जमू नये असे महापालिकेने स्पष्ट केले असून हे आदेश खडकी व पुणे कॅण्टोंमेंट बोर्ड परिसरातील भागालाही लागू राहणार आहेत.

--------------------------

Web Title: Celebrate Goat Eid simply