पर्यावरण दिन उत्साहात साजरा
By Admin | Updated: June 6, 2015 22:06 IST2015-06-06T22:06:21+5:302015-06-06T22:06:21+5:30
येथील बिल्ट ग्राफिक कंपनीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुमारे पाचशे झाडे लावण्यात आली. कंपनीच्या वतीने आजतागायत दोन लाखांहून अधिक झाडे कंपनी परिसरात लावण्यात आली आहेत.

पर्यावरण दिन उत्साहात साजरा
बारामती : येथील बिल्ट ग्राफिक कंपनीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुमारे पाचशे झाडे लावण्यात आली. कंपनीच्या वतीने आजतागायत दोन लाखांहून अधिक झाडे कंपनी परिसरात लावण्यात आली आहेत.
अजून दीड हजार झाडे लावण्याचा संकल्प प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे औषधी वनस्पतींचे उद्यान करण्याचा कंपनीचा मानस आहे. त्यात सर्व प्रकारच्या औषधी वनस्पतींचा समावेश असेल. या वेळी झालेल्या कार्यक्रमात बिल्ट युनिटप्रमुख नागेंद्र भट यांनी पर्यावरणाच्या वेगवेगळ्या बाबींवर प्रकाश टाकला. पर्यावरणाविषयी कामगारांमध्ये जागृती निर्माण केली. या वेळी ऊर्जा विभागाचे प्रमुख दिलीप वडोदकर, अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख अनिल ट्रकरू, मनुष्यबळ विभागाचे महाव्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे, संग्रामसिंह गायकवाड, रमेश कुलकर्णी, सोमनाथ कुलकर्णी, कामगार युनियनचे अध्यक्ष प्रमोद बंडगर, जनरल सेक्रेटरी सीताराम खारतोडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमास पर्यावरण विभागप्रमुख दिलीप राजदेव यांनी कंपनीचे पर्यावरणविषयक अहवालवाचन केले. (वार्ताहर)