शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांना मानवंदना देत ४८ वा 'विजय' दिवस उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 18:34 IST

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन

ठळक मुद्देराष्ट्रीय युद्ध स्मारक येथे कार्यक्रम : लष्करी शिस्तीत हुतात्म्यांना आदरांजली

पुणे : गुलाबी थंडी... लष्करी शिस्त आणि देशभक्तिपर गाण्यांच्या चालींवर लष्करातील अधिकारी आणि जवानांनी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना सोमवारी पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे मानवंदना देत ४८ वा विजय दिवस उत्साहात साजरा केला. या वेळी भारतमातेच्या संरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना वंदन करण्यासाठी सामान्य नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यासाठी सोमवारी (दि. १६) विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी पुष्पचक्र अर्पण करून युद्धात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना वाहिली. या प्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, माजी हवाईदल प्रमुख पी. व्ही. नाईक, निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर तसेच १९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या निवृत्त अधिकारी आणि जवानांनी पुष्पचक्र वाहून शहिदांना आदरांजली दिली.  ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर या १३ दिवसांच्या काळात १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध लढले गेले. पाकिस्तानकडून भारताच्या अकरा हवाई अड्ड्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे या युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात पाकिस्तानी सैन्याचा धुव्वा भारतीय सैन्यांनी उडवत पाकिस्तानला नमवत पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेशची निर्मिती केली.  तब्बल ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्र खाली ठेवत भारतीय फौजांपुढे शरण आले. या युद्धात दक्षिण मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रातील जवानांनी देशाच्या सीमारेषांचे रक्षण करण्यासाठी मोठे योगदान दिले. या युद्धात लौंगेवाला येथे झालेल्या लढाईचा विशेष उल्लेख केला जातो. लष्कराच्या अत्युच्च साहस, शौर्य आणि त्यागाचे प्रतीक म्हणून इतिहासात १९७१ च्या युद्धाचा उल्लेख करण्यात आला आहे.

................विद्यार्थ्यांनी गायली देशभक्तीपर गाणी१९७१ च्या युद्धातील जवानांना आदरांजली वाहण्यासाठी पुण्यातीळ विविध केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय युध्द स्मारक येथील मानवंदनेच्या कार्यक्रमात देशभक्तिपर गीते गायली. त्यांना उपस्थित लष्करी अधिका-यांनी प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे कौतूक केले. याच बरोबर राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल सैनी यांनी या विद्यार्थ्यांची संवाद साधला. 

 

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानwarयुद्ध