पारंपरिक पद्धतीने झाडांचा वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST2021-06-09T04:12:29+5:302021-06-09T04:12:29+5:30

आधार सोशल फाउंडेशनच्या वतीने शहराच्या मध्यवस्तीमध्ये गेल्या ८ वर्षांपूर्वी लावलेल्या आणि वाढविलेल्या सुमारे ८० झाडांचा वाढदिवस थोरले बाजीराव रस्त्यावरील ...

Celebrate the birthday of the tree in the traditional way | पारंपरिक पद्धतीने झाडांचा वाढदिवस साजरा

पारंपरिक पद्धतीने झाडांचा वाढदिवस साजरा

आधार सोशल फाउंडेशनच्या वतीने शहराच्या मध्यवस्तीमध्ये गेल्या ८ वर्षांपूर्वी लावलेल्या आणि वाढविलेल्या सुमारे ८० झाडांचा वाढदिवस थोरले बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान चौकात साजरा करण्यात आला. खासदार गिरीश बापट, आमदार सुनील कांबळे, भाजपा पुणे शहर संघटक सरचिटणीस राजेश पांडे, भाजपा उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे, मुख्य आयोजक आधार सोशल फाउंडेशनचे संस्थापक दिलीप काळोखे, प्रसाद जोशी, अनिल काळोखे, सविता काळोखे, गणेश येनपुरे, राहुल हांडे, पूरन हुडके, अनिल पवार, राजेश शिंदे, यश शिंदे, राजू आखाडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात अंबिकामाता भजनी मंडळ, राम दहाड, प्रकाश ढगे या पर्यावरण रक्षकांचा रोप देऊन सन्मान करण्यात आला.

झाडांचा वाढदिवस करण्यासाठी नवदीप मित्र मंडळ, लोकमान्य टिळक प्रथम स्थापित गणपती ट्रस्ट (विंचूरकर वाडा, दिग्वीजय मित्र मंडळ, लाकडी गणपती मंडळ, श्री शिवाजी मित्र मंडळ, वनराज मित्र मंडळ, तक्षशिला बुद्ध विहार व शिवराज मित्र मंडळ, समर्थ मित्र मंडळ व अभियान प्रतिष्ठान, स्वारगेट पोलीस वसाहत, सनी क्रिकेट ११ यांसह अनेक मंडळे सहभागी झाली आहेत.

Web Title: Celebrate the birthday of the tree in the traditional way