शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या वर्धापनदिनानिमित्त आज स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:56 IST

पुणे : वाचकांच्या पाठबळावर पुण्यातील प्रथम क्रमांकाचे दैनिक बनलेल्या ‘लोकमत’ने अठरा वर्षे पूर्ण करून एकोणिसाव्या वर्षात पदार्पण केले आहे.

पुणे : वाचकांच्या पाठबळावर पुण्यातील प्रथम क्रमांकाचे दैनिक बनलेल्या ‘लोकमत’ने अठरा वर्षे पूर्ण करून एकोणिसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. वर्धापनदिनानिमित्त ‘ब्रॅँड पुणे’चा गजर करीत पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, प्रशासन, उद्योग, व्यापार, जाहिरात आदी क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत वाचकांच्या साथीत गुरुवारी सिंहगड रस्त्यावरील ‘लोकमत’ कार्यालयात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या ‘लोकमत’ने पुण्यात अनेक उपक्रमांचा श्रीगणेशा करीत ‘लोकमत’ने पुणेकरांच्या आशा-आकांक्षा पूर्ण केल्या. पुण्याच्या नागरी प्रश्नांना ‘आता बास’, ‘कशासाठी पुण्यासाठी’ यांसारख्या मोहिमांमधून वाचा फोडली. पुण्याच्या विकासासाठी उत्तरे शोधण्यासाठी ‘व्हिजन पुणे’, ‘बिल्डिंग पुणे’ यांसारखे उपक्रम राबविले. समाजातील सर्व घटकांना त्यामध्ये सहभाग घेता यावा, यासाठी ‘मी पत्रकार’ हा अभिनव उपक्रम राबविला. अनेक प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ‘लोकमत’ने सुरू केलेला ‘ती’चा गणपती हा उपक्रम तर महिला सन्मानाची चळवळ बनला आहे. यंदाच्या वर्धापनदिनाची ‘लोकमत’ची संकल्पना ‘ब्रॅँड पुणे’ ही आहे. पुण्याचा गौरवशाली वारसा कल्पनांचे पंख लावून नवनिर्मितीसाठी भरारी घेत आहे. एक शहर म्हणून पुणे जगभरात आपली ओळख निर्माण करीत आहे. देदीप्यमान इतिहास, सामाजिक चळवळींनी घडविलेली नवी वाट, शिक्षणाच्या प्रकाशातून ‘आॅक्सफर्ड आॅफ दि ईस्ट’ ही मिळविलेली ओळख, व्यापार-उद्योगांतील कर्तृत्वातून झालेली प्रगती, साहित्य-कला-संस्कृतीच्या जपणूकीतून मिळालेले सांस्कृतिक राजधानीचे बिरुद ते आजचे शांत, सुरक्षित, प्रगतिशील, कॉस्मोपॉलिटन पुणे या सगळ्या प्रवासात सर्वांचाच हातभार लागला आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी ‘ब्रॅँड पुणे’ ही मोहीम ‘लोकमत’च्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. या मेळाव्याला वाचक, लेखक, विक्रेते, जाहिरातदार, वितरक, हितचिंतक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवारातर्फे संपादक विजय बाविस्कर आणि वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई यांनी केले आहे़।प्रगतीची गरूडभरारी घेत, ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट करीत, समाजहितासाठी आक्रमकता आणि विधायक दृष्टिकोनाचा पाया मजबूत करीत ‘लोकमत’ची दमदार वाटचाल सुरू आहे़ ऋणानुबंधाच्या या गाठी आणखी घट्ट करण्यासाठी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.