विसर्जन घाटावर सीसीटीव्हीचा वॉच
By Admin | Updated: September 8, 2014 03:59 IST2014-09-08T03:59:04+5:302014-09-08T03:59:04+5:30
खडकवासला प्रकल्पातील धरणे फुल्ल आहेत. पावसाळी वातावरणामुळे अतिरिक्त पाणी सोडल्यास नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जाणार आहे

विसर्जन घाटावर सीसीटीव्हीचा वॉच
पुणे : खडकवासला प्रकल्पातील धरणे फुल्ल आहेत. पावसाळी वातावरणामुळे अतिरिक्त पाणी सोडल्यास नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जाणार आहे. त्यासाठी नदीपात्रातील काही विसर्जन स्थळामध्ये बदल केला जाणार आहे. शहरातील ५५ विसर्जन घाटांवर
सुमारे १५० सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे विसर्जन घाटावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, महापालिकेची सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची आढावा बैठक रविवारी झाली. त्या वेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अ. कपोले, उपायुक्त मकरंद रानडे, बा. भ. लोहार, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त सुनील केसरी, अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे, आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने व सहायक आयुक्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)