भुगाववर आता सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:09 IST2020-12-09T04:09:02+5:302020-12-09T04:09:02+5:30
पौड : भुगाव (ता. मुळशी) येथे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायत हद्दीतील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे. यामुळे भविष्यातील गैरप्रकारांना ...

भुगाववर आता सीसीटीव्हीची नजर
पौड : भुगाव (ता. मुळशी) येथे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायत हद्दीतील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे. यामुळे भविष्यातील गैरप्रकारांना आळा बसणार आहे. या सोबत चोरट्यांचाही माग काढणे सोपे होणार आहे.
भुगावचा वाढता विस्तार, चोरी, अपघात यासारख्या घटनांचा विचार करून ग्रामपंचायत ग्रामनिधीतुन रामनदी म.न.पा हद्दीपासुन ते श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशयापर्यंत पुणे-कोलाड महामार्गावर व अंतर्गत जोडरस्त्याच्या ठिकाणी एकूण ५३ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याची माहिती भूगावच्या सरपंच निकिता सणस यांनी दिली. या सुरक्षा यंत्रणेच्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन ग्रामपंचायत कार्यालयात पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपसरपंच सतिश इंगवले, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार, उपसरपंच विशाल भिलारे, ग्रामपंचायत सदस्य वैशाली चोंधे, वैशाली सणस, सुरेखा शेडगे, पार्वती शेडगे, सुनिता पोळ, पोलीस पाटील, नितीन चोंधे,दिलीप चोंधे,ट्रॅफिक हवालदार साळुंखे उपस्थित होते.
चौकट या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे ग्रामस्थाबरोबरच विशेषतः महिलांच्या सुरक्षितेसाठी मदत होणार आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची व प्रवाशांची येजा सुरू असते. कॅमेऱ्यामुळे बेशिस्त वाहन चालकांवर नियंत्रण येण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे हे काम महत्वाचे होते.
निकीता रमेश सणस, सरपंच
चौकट
मुळशी तालुक्याचे विस्तारित भौगोलिक क्षेत्र व त्या तुलनेत अपुरे असलेले मनुष्य बळ यासाठी भुगावमधील या सीसीटीव्हीमुळे पोलिसांना मोठी मदत होणार आहे. महामार्ग व गावाच्या सुरक्षेसाठी या कॅमेऱ्यांचा उपयोग होईल.
- वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ
फोटो ओळ - भुगाव (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायत कार्यालयात सीसी टीव्ही नियंत्रण कक्षाचे उद्घाटन करताना पौडचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकारी