पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत देशभरात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. २६) आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.बारावीची परीक्षा दि. ५ मार्च ते १३ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली. देशभरातून सुमारे ११ लाख ८६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांची ४ हजार १३८ केंद्रांवर परीक्षा झाली. मंडळाच्या www.cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध असेल. निकालानंतर मंडळाकडून दि. ९ जूनपर्यंत सकाळी ८ ते रात्री १० यावेळेत दुरध्वनीद्वारे विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची सुविधा उपलब्ध असेल. विद्यार्थी व पालकांना इयत्ता दहावी व बारावी निकालबाबतच्या अडचणींबाबत देशभरातील ६९ तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन मिळेल. त्यामध्ये शाळांच्या प्राचार्य, प्रशिक्षित समुपदेशक, शिक्षणतज्ज्ञांचा समावेश आहे. समुपदेशनासाठी १८००११८००४ हा टोल फ्री क्रमांक आहे.
सीबीएसई बारावीचा शनिवारी निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 20:52 IST
सीबीएसई मार्फत देशभरात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी (दि. २६) आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे.
सीबीएसई बारावीचा शनिवारी निकाल
ठळक मुद्देदेशभरातून सुमारे ११ लाख ८६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी