गोमांसची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:08 IST2021-06-30T04:08:21+5:302021-06-30T04:08:21+5:30

या कारवाईत तब्बल अडीच लाख रूपये किंमतीचे चौदाशे किलो गोमांस आढळून आले असून दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत ...

Caught the tempo transporting the beef | गोमांसची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

गोमांसची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

या कारवाईत तब्बल अडीच लाख रूपये किंमतीचे चौदाशे किलो गोमांस आढळून आले असून दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी सांगितले.

तन्वीर इसलाम शेख (वय 34 रा मानपाडा मुंबई) व टेम्पो चालक राजू बाबू अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी टेम्पो जप्त करत आतील गोमांस हस्तगत केले व तन्वीर शेख व राजू बाबू यांचेवर गुन्हा दाखल केला.

याबाबत पोलीस हवालदार केशव कोरडे यांचे फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधितांवर पशु संरक्षण अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करत अटक केली. पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक निळकंठ कारखिले पुढील तपास करत आहेत.

आळेफाटा पोलिसांनी बेकायदेशीर गोमांस वाहतूक करणारा पकडलेला टेंम्पो.

Web Title: Caught the tempo transporting the beef