खून करून पळणाऱ्या सराईतास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:10 IST2021-05-22T04:10:02+5:302021-05-22T04:10:02+5:30

पुणे : मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मारेक-याचा खून करून पसार झालेल्या सराईताला डेक्कन पोलिसांनी सापळा रचून नदीपात्रातील रस्त्यावर शुक्रवारी ...

Caught the murderer fleeing Saraita | खून करून पळणाऱ्या सराईतास पकडले

खून करून पळणाऱ्या सराईतास पकडले

पुणे : मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मारेक-याचा खून करून पसार झालेल्या सराईताला डेक्कन पोलिसांनी सापळा रचून नदीपात्रातील रस्त्यावर शुक्रवारी पकडले.

अक्षय प्रकाश माने (वय २४, रा. पर्वती दर्शन, पुणे-सातारा रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. माने आणि साथीदारांनी गेल्या महिन्यात निगडी भागात वैमनस्यातून शक्तिमान प्रकाश कांबळे याचा खून केला होता. खून प्रकरणात गेले एक महिना तो पसार होता. पसार झालेला माने याचा पोलिसांकडून शोध सुरू होता. तो रात्री डेक्कन नदीपात्रातीतल रस्त्यावर थांबला असल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली. मानेला पोलिसांनी सापळा लावून पकडले. माझ्या मित्राचा शक्तिमान कांबळे व त्याच्या सहकाऱ्यांनी खून केला होता. तो राग मनात धरून मी व माझ्या सहकाऱ्यांनी शक्तिमान कांबळे याचा खून केल्याची कबुली त्याने दिली. त्याला निगडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक आयुक्त मालोजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, उपनिरीक्षक किशोर शिंदे, हवालदार गद्रे, चव्हाण, शिंगाडे, डामसे, वाघमारे, रायकर, कोटकर आदींनी ही कारवाई केली.

---

Web Title: Caught the murderer fleeing Saraita