शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

चाकणला १८० पोती गुटखा पकडला, ५० लाखाचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 22:20 IST

चाकण : येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयासमोर पुणे-नाशिक महामार्गावरून टेम्पोमधून अवैध गुटख्याची वाहतूक करताना चाकण पोलीस व एफडीआयने संयुक्तरित्या कारवाई करून अंदाजे पन्नास लाख रुपये किंमतीचा १८० पोती गुटखा पकडला.याप्रकरणी चाकण पोलीस व अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक आयशर टेम्पोसह १८० पोती गुटखा जप्त केला ...

चाकण : येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयासमोर पुणे-नाशिक महामार्गावरून टेम्पोमधून अवैध गुटख्याची वाहतूक करताना चाकण पोलीस व एफडीआयने संयुक्तरित्या कारवाई करून अंदाजे पन्नास लाख रुपये किंमतीचा १८० पोती गुटखा पकडला.

याप्रकरणी चाकण पोलीस व अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक आयशर टेम्पोसह १८० पोती गुटखा जप्त केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई आज सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास करण्यात आली. गुप्त खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून एसीपी चंद्रकांत अलसटवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार, सातकर, अजय भापकर, एफडीआयचे अधिकारी महेंद्र पाटील व काकडे यांच्या पथकाने हि कारवाई केली. याप्रकरणी अब्दुलजार जमलुद्दीन शेख ( रा. वालिव चौक, वसई, जि.पालघर ) व अरुण रावसाहेब खोत ( रा. पंढरपूर ) या दोघांना आयशर टेम्पो क्रमांक ( एम एच १२ - एल टी - ३९८६ ) सह ताब्यात घेऊन टेम्पोतील गुटखा जप्त केला आहे.  

टॅग्स :ChakanचाकणCrime Newsगुन्हेगारी