आळेफाटा येथील गायींचा बाजार पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:08 IST2021-07-02T04:08:19+5:302021-07-02T04:08:19+5:30
कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे आळेफाटा येथील उपबाजारही गेल्या दोन महिन्यांपासून बंद होता. लॉकडाऊन शिथिल ...

आळेफाटा येथील गायींचा बाजार पूर्वपदावर
कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे आळेफाटा येथील उपबाजारही गेल्या दोन महिन्यांपासून बंद होता. लॉकडाऊन शिथिल होताच सगळीकडची परिस्थित पूर्ववत होऊ लागली आहे. गुरुवारी भरलेल्या गायींचा बाजारातही आर्थिक उलाढाल पहायला मिळाली. येथील बाजारात प्रतवारीच्या गायी मिळत असल्याने पुणे जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यांतील शेतकरी येथे गायी खरेदी करण्यासाठी नेहमी येत असतात. यामुळे येथे गायींची आवक चांगल्या प्रमाणात होत असते. विशेष म्हणजे या बाजारात संकरित गायींच्या कालवडींची विक्रीस येतात. शेतकरी या कालवडी खरेदी करण्यासही प्राधान्य देतात. गुरुवारी जवळपास २४० गायी येथे विक्रीस आल्या. तर प्रतवारीप्रमाणे ३० ते ८० हजार रुपयांपर्यंत विक्री झाली, अशी माहिती सभापती संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे यांनी व सचिव रूपेश कवडे यांनी दिली. दरम्यान, आळेफाटा येथील संकरित गायींचे बाजारात आरोली गुजरात येथील आशिषभाई पटेल, हैदराबाद आंध्र प्रदेशचे राकेश रेड्डी हे व्यापारी संकरित गायी खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांनी प्रत्येकी आठ व सहा गायी खरेदी केल्या.
०१ आळेफाटा
आळेफाटा येथील उपबाजारात भरलेला संकरित गायींचा आठवडे बाजार.