टेम्पोच्या धडकेत सख्खे चुलत भाऊ ठार

By Admin | Updated: March 24, 2017 03:55 IST2017-03-24T03:55:42+5:302017-03-24T03:55:42+5:30

ओव्हरटेक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला उडविल्याने दुचाकीवरील दोन सख्खे चुलत तरुण भाऊ जागीच ठार झाले़ ही घटना

The cats in the tempo killed a cousin | टेम्पोच्या धडकेत सख्खे चुलत भाऊ ठार

टेम्पोच्या धडकेत सख्खे चुलत भाऊ ठार

नारायणगाव : ओव्हरटेक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला उडविल्याने दुचाकीवरील दोन सख्खे चुलत तरुण भाऊ जागीच ठार झाले़ ही घटना पुणे-नाशिक रोडवर नारायणगाव येथील सभापती कॉर्नरजवळ आज पहाटे घडली़
अपघातात बाबूराव जयसिंग अडसरे (वय २५) व महेंद्र भीमाजी अडसरे (वय २५, दोघेही रा़ वळणवाडी, ता. जुन्नर) हे अपघातात जागीच मृत्युमुखी झाले आहेत़
या अपघातप्रकरणी आयश्र टेम्पोचालकावर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी ही माहिती दिली़ दरम्यान दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने नारायणगाव, वारूळवाडी व वळणवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़ बाबूराव याचा शेती व ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता़ त्याचा येत्या १७ एप्रिलला विवाह होणार होता़ तर, महेंद्र हा बँकेत काम करत होता. त्याचे वर्षभरापूर्वीच लग्न झालेले असून त्याची पत्नी आठ महिन्यांची गरोदर आहे़ या तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़

Web Title: The cats in the tempo killed a cousin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.