शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

अनुसूचित जाती वर्गात समावेश करावा, राष्ट्रीय नाभिक महासंघाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 3:45 AM

नाभिक समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात अनेकदा चर्चा केली. परंतु शासनाकडे मागणी करूनही दखल घेतली गेली नाही. दिलेली आश्वासने फिरवली. मागणीचा विचार करून आमचा समावेश अनुसूचित जातीत केला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आमची ताकद दाखवू, असा इशारा राष्ट्रीय नाभिक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर दिला.

पुणे - नाभिक समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात अनेकदा चर्चा केली. परंतु शासनाकडे मागणी करूनही दखल घेतली गेली नाही. दिलेली आश्वासने फिरवली. मागणीचा विचार करून आमचा समावेश अनुसूचित जातीत केला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आमची ताकद दाखवू, असा इशारा राष्ट्रीय नाभिक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर दिला.महासंघाचे अध्यक्ष भगवानराव बिडवे यांच्यासह नाभिक समाज संघटनांचे पदाधिकारी ज्येष्ठ समाजसेविका सुमन पवार, चंद्रशेखर जगताप, अकुंश खडके, बेबीताई करेकर, मोहन सूर्यवंशी, दत्तात्रय मोरे, प्रभाकर सोनवले, सचिन जगताप, चंद्रशेखर जगताप, बाळासाहेब सांगळे, बबन काशीद, अंकुश बिडवे, महेश सांगळे, नीलेश पांडे, राजेश पाथरकर, तुषार खडके, पुंडलिक सैंदाने, माधुरी सांगळे, राजेश गायकवाड उपस्थित होते. समाजाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन पूर्वी अगदी खालच्या पातळीचा होता. परंतु तटस्थ राहणारा हा समाज आता संघर्ष करू लागला आहे. संपूर्ण राज्यात केशकला बोर्डाची निर्मिती करावी. गेली अनेक वर्षे आमच्या समाजाने विविध मागण्या केल्या आहेत. मागील ४५ वर्षांपासून लोकशाही मार्गाचा अवलंब करीत धरणे, मोर्चे, उपोषणे आदी माध्यमातून पाठपुरावा करीत आहोत. सरकार येते आणि जाते; परंतु मागण्यांचा विचारच होत नाही, अशी खंतही बिडवे यांनी व्यक्त केली.नाभिक महासंघाच्या प्रमुख मागण्यासलून व्यावसायिक आणि कारागिरांना मोफत आरोग्यसेवा मिळावी.नाभिक समाजाला सलून व्यवसायासाठी शासकीय रुग्णालये, ग्रामपंचायती, विविध कार्यकारी संस्था, बसस्थानक, शासकीय, निमशासकीय वसाहती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, मनपा हद्दीतील शॉपिंग सेंटरमध्ये राखीव गाळे देण्यात यावे.शूरवीर जिवा महाले यांचे स्मारक प्रतापगडावर उभारण्यात यावे.स्वातंत्र्यवीर हुतात्मा वीर भाऊ कोतवाल यांचे स्मारक माथेरान येथे उभारावे.महाराष्ट्र शासनातर्फे मंडल आयोगाच्या शिफारशी १०० टक्के लागू कराव्यात.नाभिक समाजाला सांस्कृतिक भवनाकरिता जागा द्यावी व भवन निर्माण करावेनाभिक समाजाला शिक्षण आणि नोकरीकरिता क्रिमीलेअरची अट रद्द कराव्यात.नाभिक समाजाला अ‍ॅट्रॉसिटीसारखा कायदा लागू करावा.अनेकदा चित्रपटात नाभिक समाजाबद्दल आक्षेपजनक वक्तव्य व चित्रीकरण केले जाते. नाभिक समाज आपले काम इमानदारीने करीत आहे. आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणताही नाभिक चित्रपटात दाखविल्याप्रमाणे वागत नाही. त्यामुळे चित्रपटात नाभिक समाजाबद्दल आक्षेपजनक सीन दाखविण्यात येतात. यामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या जातात.- चंद्रशेखर जगतापमहिलांना सक्षम करण्यासाठी आमचे महामंडळ काम करते. ब्युटीपार्लर हा आमच्या समाजाचा व्यवसाय असल्याकारणामुळे आम्ही सर्व महिलांना या व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण देतो. या मंडळाद्वारे महिलांना व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्यात येते. तसेच खेड्यातील मुलींना मोफत ब्युटी पार्लर सेमिनार आयोजित करणार आहे.- बेबी करेकरमी महिला बचट गटांच्या माध्यमातून महिला व मुलींसाठी कार्य केले. आम्ही महिलांसाठी विविध सेमिनार घेतो. महिलांसाठी कार्य करण्यासाठी रणरागिणी नावाचा एक ग्रुप तयार केला आहे. मी फ्री ब्युटी पार्लरचा ३ ते चार महिन्यांचा कोर्स महिलांसाठी घेणार आहे. - सुमन पवारनाभिक समाज वधू-वर मेळावा यामध्ये गेली दहा वर्षे कार्यरत आहे. कमी खर्चात लग्न करून दिली त्यामुळे या वधू-वर मेळाव्यात तळागाळातील लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश झाला. अशा प्रकारची कामे करताना आम्हाला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते.- दत्तात्रय मोरेआजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मॉडर्न टेक्नॉलॉजी आत्मसात करणे काळाची गरज आहे. नाभिक समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा पर्यावरणपूरक व्हावा. हा समाज स्वामिनिष्ठ आहे.- राजेश पाटणकरगेली २५ वर्षे समाजासाठी कार्य करीत आहे. प्रत्येक मार्गात अण्णांचे योग्य मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच आज आम्ही यशाचे शिखर गाठले आहे.- प्रभाकर सोनवणेमाहिलांच्याबाबतीत असलेल्या उपक्रमांसाठी मी नेहमी सक्षम असते. मी एक नाभिक आहे. न भीक मागता आम्ही सर्व काही करतो. आपली कला आहे ती वाया जाऊ देऊ नका, असे महिलांना आवाहन आहे. महिलांनी पुढाकार घ्यायला हवा.- माधुरी सांगळे,जिल्हा संपर्कप्रमुख, महिला आघाडीहे महामंडळ महाराष्ट्रामध्ये नाभिक समाजाचे मोठे संघटन आहे. बलुतेदारीची परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे. पूर्वी बलुतेदारी पद्धतीमुळे या समाजाचा विकास होत नव्हता. हातामध्ये रोख पैसा नसल्याकारणाने इतर सुविधांपासून तो परावलंबी राहायचा. या महासंघाच्या माध्यमातून बलुतेदार पद्धत मोडीस काढली. त्यानंतर काम तेथे दाम असे चालू झाले. खºया अर्थाने या समाजाच्या उत्कर्षाला सुरुवात झाली. पण ज्यावेळी व्यवसायामध्ये रूपांतर झाले. रोख पैसा मिळायला लागला. मुले शिक्षणाकडे वळली, शिक्षणाचे महत्त्व समजले यातूनच ६० टक्यांपर्यंतचा टप्पा गाठला गेला. - भगवानराव बिडवे

टॅग्स :newsबातम्याPuneपुणे