शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Pune: ५० लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी पेठे ज्वेलर्सचे मालक पराग आणि तनय पेठेंवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 10:01 IST

कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

- किरण शिंदे

पुणे : ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध पेठे ज्वेलर्सच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेकलेस आणि डायमंडच्या बांगड्या देण्याचे आमिष दाखवून पेठे ज्वेलर्सच्या मालकांनी एका व्यक्तीकडून तब्बल 60 लाख रुपये घेतले होते. मात्र त्यानंतरही नेकलेस आणि डायमंडच्या बांगड्या न देता त्या व्यक्तीची फसवणूक केली. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पराग चंद्रकांत पेठे (रा. ११०२/बी, कपिल वास्तू, कर्वेनगर) आणि तनय पराग पेठे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेला दोघांची नावे आहे. भादंवि ४२०, ४०६, ३६ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेंद्र विनोदचंद्र शहा (वय ४९, पर्वती) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील आयडियल कॉलनी परिसरात पेठे ज्वेलर्स आहे. ज्वेलर्सचे मालक पराग पेठे आणि तनय यांनी फिर्यादी यांना कमी भावात नेकलेस आणि डायमंडच्या बांगड्या देण्याचे अमिष दाखवून फिर्यादी यांना गुंतवणूक करण्यास सांगितले. फिर्यादीनेही त्यांच्यावर विश्वास ठेवून रोख २५ लाख आणि आरटीजीएसद्वारे ३५ लाख असे साठ लाख रुपये त्यांच्याकडे गुंतवले. त्यानंतर फिर्यादी आणि आरोपी यांच्यात स्टॅम्प पेपरवर करार देखील झाला आहे. मात्र असे असतानाही आरोपींनी फिर्यादी यांना कराराप्रमाणे नेकलेस आणि डायमंडच्या बांगड्या दिल्या नाहीत. 

फिर्यादी यांनी आरोपींकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून टाळाळ केली. फिर्यादी यांनी पैसे परत मिळवण्यासाठी तगादा लावला असता पराग पेठे यांनी दहा लाख रुपये दिले. उर्वरित पन्नास लाख रुपये अद्यापही दिले नाहीत. त्यामुळे विश्वासघात करून फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादी यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काटकर करत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी