शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

Pune: गोयल गंगा ग्रुपचे अतुल गोयल, अमित गोयल यांच्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 13:53 IST

याप्रकरणी राहुल कैलास तिकोणे (वय ५०, रा. कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली आहे...

पुणे : अधिकार नसताना कुलमुख्यत्यार पत्र घेऊन ते मिळकतीचे खरेदी खत करुन ते खरे असल्याचे भासवून झोपडपट्टी पूनर्वसन कार्यालयात झोपडपट्टी पूनर्वसनाचा प्रस्ताव (एसआरए) दाखल करुन वारसदार व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गोयल गंगा ग्रुपचे अतुल जयप्रकाश गोयल आणि अमित जयप्रकाश गोयल यांच्यासह चौघांनावर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राहुल कैलास तिकोणे (वय ५०, रा. कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार बिबवेवाडी येथील मिळकतीबाबत ४ फेब्रुवारी २००६पासून आजपर्यंत घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गोयल यांच्याबरोबरच कैलास किसन तिकोणे आणि छबन फक्कडराव थोरवे (रा. तुळशीनगर, बिबवेवाडी) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांचाही मृत्यु झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल कैलास तिकोने आणि छबन थोरवे यांना बिबवेवाडी येथील मिळकतीचे कुलमुख्यत्यार पत्र करुन देण्याचे कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना त्यांनी २००६ मध्ये गोयल गंगा  ग्रुपचे अमित गोयल यांना या मिळकतीचे कुलमुख्यत्यार पत्र दिले. अतुल व अमित गोयल यांनी या मिळकतीचे खरेदी खत करुन ते खरे असल्याचे भासविले. झोपडपट्टी पूनर्वसन कार्यालयात झोपडपट्टी पूनर्वसनाचा (एसआरए) प्रस्ताव दाखल केला. फिर्यादी व इतर वारसदारांची तसेच शासनाची फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक झावरे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड