पुरंदर विमानतळासंदर्भात आमदार शेतकऱ्यांच्या बाजूने, शेतकरी जो निर्णय घेतील तो मान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:10 IST2021-02-05T05:10:09+5:302021-02-05T05:10:09+5:30

ते पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव येथे सिद्धेश्वर मंदिरात विमानतळबाधित गावांंतील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते. नियोजित ...

In the case of Purandar Airport, the MLAs are in favor of the farmers, whatever decision the farmers take | पुरंदर विमानतळासंदर्भात आमदार शेतकऱ्यांच्या बाजूने, शेतकरी जो निर्णय घेतील तो मान्य

पुरंदर विमानतळासंदर्भात आमदार शेतकऱ्यांच्या बाजूने, शेतकरी जो निर्णय घेतील तो मान्य

ते पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव येथे सिद्धेश्वर मंदिरात विमानतळबाधित गावांंतील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते.

नियोजित पारगाव, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, वनपुरी, उदाचीवाडी या गावांतील दोन हजार चारशे हेक्टर जागेवर विमानतळ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तशा विविध परवानग्या देखील घेण्यात आल्या होत्या. मात्र या जागेला तीव्र विरोध झाल्यानंतर पूर्व भागातील रिसे, पिसे राजुरी, नायगाव, पांडेश्वर ही जागादेखील सध्या चांगलीच चर्चेची बनली आहे. विमानतळास आपल्या जमिनी जाणार व आपली गावे भकास होणार या भीतीने या गावातून विमानतळास विरोध करण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. प्रत्येक गावाच्या बैठका झाल्यानंतर विमानतळबाधित गावातील ग्रामस्थांनी नायगाव येथे विमानतळास विरोध करण्यासाठी व पुढची भूमिका ठरवण्यासाठी एकत्रित बैठक घेण्यात आली.

या बैठकीत शेतकऱ्यांच्या शंकेचे निरसण करुन आमदार संजय जगताप पुढे म्हणाले की पारगाव परिसरातील जागेस शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होता. म्हणून ही पर्यायी जागा सुचवण्यात आली. मात्र या जागेचा कोणताही सर्वे करण्यात आलेला नाही. शेतक-यांना विमानतळ नको असेल तर ते होणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले. या वेळी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे, माजी आमदार अशोक टेकवडे, राजुरीचे सरपंच उद्धव भगत,पिसेचे माजी सरपंच गणेश मुळीक, रिसेचे माजी सरपंच विश्वास आंबोले, नायगावचे विलास खेसे, प्रदीप खेसे, सदाशिव खेसे, बाळासो कड, महेश कड, नारायण चौंडकर, सदाशिव खेसे यांनी विमानतळासंदर्भात मनोगत व्यक्त करुन विरोध दर्शवला. १) जर येथील स्थानिक शेतक-यांना विमानतळ नको असेल तर ते होणार नाही. शेतकरी हो म्हटला तरच होईल. आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहे. शेतकऱ्यांची मान्यता नसल्यास कुठलाही प्रकल्प होणार नाही. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यासाठी आपण मला निवडून दिले नाही. यामुळे कुठलीही शेतकऱीविरोधी चुकीची गोष्ट होऊ देणार नाही. याबाबत आपण निश्चिंत रहा सध्या तालुक्यात हो म्हणायचेही राजकारण व नाही म्हणायलाही राजकारण केले जाते आणि नाहीच झाले तरी राजकारण होते अशी टीकादेखील त्यांनी विरोधी गटावर केली.

आमदार पुढे म्हणाले की राजकारण करण्यासाठी पद घेतले नसून तालुक्यातील प्रत्येक माणसाची पदाच्या माध्यमातून कामे करण्यासाठी प्रयत्न करत असून तो माणूस कुठल्या पक्षाचा हे मी पाहत नाही .उद्या सकाळी म्हटलं तरी माझी राजीनाम्याची तयारी आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे अशा शब्दांत आमदार संजय जगताप यांनी आपल्या भावना विमानतळबाधित गावातील ग्रामस्थांसमोर मांडल्या.

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव येथे विमानतळासंदर्भात भूमिका मांडताना आमदार संजय जगताप.

Web Title: In the case of Purandar Airport, the MLAs are in favor of the farmers, whatever decision the farmers take

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.