शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत भाजप कार्यालयाच्या फलकावर काळा रंग टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 18:41 IST

फलकावर काळा रंग टाकल्याची घटना....

बारामती : शहरातील भाजप कार्यालयाच्या फलकावर काळा रंग टाकल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.१३) सकाळी हा प्रकार घडला. घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार मंगळवारी (दि.१३) सकाळी सहा वाजता बारामती भाजप कार्यालयाच्या बाहेर रस्त्यालगत असणाऱ्या फलकावर व कार्यालयाच्या फलकावर काळा रंग टाकण्यात आला. रंग टाकतानाचा व्हिडीओ समाज माध्यमातून व्हायरल झाला आहे. पोलिसांनी तत्काळ या व्हिडीओमध्ये रंग टाकताना दिसणारे सचिन नानासो जगताप (३८) व कृष्णा सयाजी सोनवणे (५०) या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दोघांनी रंग टाकताना सचिन जगताप यांच्या कॅमेऱ्यामध्ये महादेव मिसाळ यांनी हा व्हिडीओ काढल्याचे सांगितले. हा व्हिडीओ काढून समाजमाध्यमांवर प्रसारीत केला.

फलकावर रंग टाकून व्हिडीओ काढून प्रसारित केला. त्यातून सार्वजनिक सुव्यवस्था बाधित करण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारची कृती केल्याने संबंधितांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक महाडीक यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाBaramatiबारामतीPoliceपोलिस