शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जमीन व्यवहाराला हरकत घेऊन खंडणी उकळल्याप्रकरणी देवेंद्र जैनसह दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 11:56 IST

या जमिनीबाबत देवेंद्र जैन यांनी अवैध उत्खनन पाण्याचा नैसर्गिक प्रवाहास अडथळा वगैरे खोट्या बातम्या देऊन बदनामी केली.

ठळक मुद्देफिर्यादी मिळकत जमिनीच्या ठिकाणी गेले असता जिवे मारण्याची धमकी

पुणे : जमीन व्यवहाराशी काहीही संबंध नसताना तिच्या नोंदीला हरकत घेऊन १५ लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणात पत्रकार देवेंद्र जैन याच्यासह दोघांवर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सदाम ऊर्फ दत्तात्रय ऊर्फ बाळासाहेब गुलाबराव कामठे याला अटक करण्यात आली असून देवेंद्र जैन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी मोहन राजू बहिरट (वय २६, रा. कामठे मळा, फुरसुुंगी) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन बहिरट यांचे आजोबा सदाशिव कामठे यांनी शेवाळवाडी येथील जमीन नोव्हेंबर २०१५ मध्ये विक्रीसाठी काढली होती. त्याचा संजय हरपाळे यांच्याबरोबर व्यवहार करण्यात आला होता. त्यावेळी सदाम कामठे याने माझ्यामार्फतच व्यवहार करायचा. नाही तर व्यवहार होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. तेव्हा भितीपोटी कामठे याला हरपळे यांनी २ लाख ७० हजार  रुपये दिले.तरीही या व्यवहाराची नोंद ७/१२ वर होऊ नये, म्हणून त्याने हरकतीचा अर्ज करुन सदाशिव कामठे व हरपळे यांच्याकडे २५ लाखांची मागणी केली. त्यातील ५ लाखांचा धनादेश घेतला. त्यानंतर त्याने हरकतीचा अर्ज मागे घेण्यासाठी १ कोटी रुपयांची मागणी करुन काहीही संबंध नसताना १५ लाख रुपये घेतले. या जमिनीबाबत देवेंद्र जैन यांनी अवैध उत्खनन पाण्याचा नैसर्गिक प्रवाहास अडथळा वगैरे खोट्या बातम्या गेल्या वर्षी देऊन बदनामी केली. मोहन बहिरट हे या मिळकतीवर गेले असताना त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. बहिरट यांच्या फिर्यादीनुसार सदाम कामठे याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस