पुण्यात अभिनेत्री पायल रोहतगी हिच्याविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST2021-09-02T04:24:12+5:302021-09-02T04:24:12+5:30
पुणे : वादग्रस्त ट्विट करून नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री पायल रोहतगी हिच्या विरोधात पुण्यातील शिवाजीननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

पुण्यात अभिनेत्री पायल रोहतगी हिच्याविरोधात गुन्हा दाखल
पुणे : वादग्रस्त ट्विट करून नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री पायल रोहतगी हिच्या विरोधात पुण्यातील शिवाजीननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महात्मा गांधी आणि काँग्रेस परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरून रोहतगी व व्हिडिओ तयार करणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी व त्यांचे कुटुंबीय, काँग्रेस परिवार यांच्याविषयी खोटा बदनामीकारक व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर पायल रोहतगी हिने प्रसारित केला. त्यातून हिंदू -मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. संगीता तिवारी यांनी अगोदर ही तक्रार सायबर पोलिसांकडे दिली होती. सायबर पोलिसांनी ती शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग केला आहे.
बॉलीवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिने यापूर्वी अनेकदा काँग्रेस व नेहरू घराण्यावर टीका केली होती. त्याबद्दल तिला यापूर्वी अटकही करण्यात आली होती. वादग्रस्त पोस्ट टाकायची नंतर अंगाशी आले की माफी मागायची अशी तिची आजवर सोशल मीडियावरील वाटचाल राहिली आहे. तिने सतीप्रथेचे समर्थन करून वाद ओढवून घेतला होता.
फोटो - पायल रोहतगी