नांदायला न नेणाऱ्या इंग्लडमधील पतीविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:15 IST2021-02-05T05:15:05+5:302021-02-05T05:15:05+5:30
पुणे : परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न पाहून अनेक तरुणी परदेशात नोकरी करणारा जोडीदार शोधतात. पण सर्वांचीच ही मनीषा पूर्ण ...

नांदायला न नेणाऱ्या इंग्लडमधील पतीविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न पाहून अनेक तरुणी परदेशात नोकरी करणारा जोडीदार शोधतात. पण सर्वांचीच ही मनीषा पूर्ण होतेच असे नाही. अनेकदा त्यात फसवणूक झाल्याचे प्रकार समोर येत असतात. विवाहितेला नांदवण्यास न नेता मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी इंग्लडला असलेल्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अंकुर सुरंदर सॅगी (वय ३६, रा. इंग्लड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुंढव्यातील विवाहितेने मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २१ जानेवारी २०१६ पासून गेली ५ वर्षे सुरु असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पती अंकुर याने लग्नानंतर फिर्यादी हिला नांदण्यासाठी सासरी घेऊन न जाता फिर्यादीच्या घरीच ठेवले. तसेच फिर्यादीने इंग्लडला घेऊन जाण्यासाठी विचारले असता सासू, दीर व जाऊ यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन मानसिक त्रास दिला. लग्नात आलेले स्त्रीधन ७ ते ८ तोळ्याचे सोन्याचे दागिने व इतर साहित्य त्यांच्याकडे ठेवून फिर्यादीला नांदविण्यास नकार देऊन छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.