जळीतकांड प्रकरणी पोलिसांचा अर्ज फेटाळला
By Admin | Updated: July 10, 2015 02:13 IST2015-07-10T02:13:12+5:302015-07-10T02:13:12+5:30
सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या जळीतकांड प्रकरणातील आरोपीचा ब्रेनमॅपिंग आणि लायडिटेक्टर चाचणी करण्याची परवानगीसाठी पोलिसांनी केलेला अर्ज गुरुवारी न्यायालयाने फेटाळला.

जळीतकांड प्रकरणी पोलिसांचा अर्ज फेटाळला
पुणे : सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या जळीतकांड प्रकरणी आरोपी अमन अब्दुलगणी शेख (वय ३२, रा. साई पॅलेस, वडगाव बुद्रुक, पूर्वी रा. दीपाली अपार्टमेंट, मुळा रोड) याची ब्रेनमॅपिंग आणि लायडिटेक्टर चाचणी करण्याची परवानगीसाठी पोलिसांनी केलेला अर्ज गुरुवारी न्यायालयाने फेटाळला. मंगळवारी पोलिसांनी आरोपीची ब्रेनमॅपिंग आणि लाय डिटेक्टर चाचणी करण्यासाठी पोलीस कोठडी अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
या प्रकरणी प्रशांत लक्ष्मण बडे (वय २९, सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे. जळीतकांडामध्ये तब्बल ६० ते ६५ लाखांचे नुकसान आरोपीने केले आहे. याप्रकरणी गुरुवारी पोलिसांनी आरोपीची ब्रेनमॅपिंग व लाय डिटेक्टर चाचणी करण्याची परवानगी मिळावी, यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळला.