विद्यापीठाकडून कॅसच्या मुलाखती ८ जानेवारीपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:33 IST2021-01-08T04:33:00+5:302021-01-08T04:33:00+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कॅस अंतर्गत पदोन्नतीची प्रक्रिया राबवावी, ही मागणी विद्यापीठाकडे सातत्याने केली. त्यामुळे विद्यापीठाने केंद्रीय पद्धतीने सर्व ...

विद्यापीठाकडून कॅसच्या मुलाखती ८ जानेवारीपासून
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कॅस अंतर्गत पदोन्नतीची प्रक्रिया राबवावी, ही मागणी विद्यापीठाकडे सातत्याने केली. त्यामुळे विद्यापीठाने केंद्रीय पद्धतीने सर्व महाविद्यालयांना आपल्या पात्र शिक्षकांचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोन वेळा मुलाखतींचे नियोजन केले. परंतु,दोन्ही वेळा विद्यापीठाने या मुलाखती काही कारणास्तव रद्द केल्या. मात्र, विद्यापीठाच्या अधिसभेपूर्वी प्राध्यापकांची कॅस अंतर्गत रखडलेली प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर अधिसभेसमोर आंदोलन करण्याचा इशारा प्राध्यापक संघटनेने दिला. त्यामुळे विद्यापीठाने येत्या ८ ते १४ जानेवारी या कालावधीत विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्याचे नियोजन केले आहे.
दोन वर्षांपासून विद्यापीठाने कॅस प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे प्राध्यापकांची पदोन्नती रखडली आहे. मात्र, विद्यापीठाने आता पदोन्नतीची प्रक्रिया रद्द करू नये, या मागणीचे निवेदन राज्याचे उच्च शिक्षण संचालक व पुणे विभगीय सहसंचालकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. एस. एम. राठोड यांनी दिले आहे.