नोटबंदीचे दुष्परिणाम देश भोगतोय : माणिकराव ठाकरे; व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे पुण्यात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 02:21 PM2017-11-04T14:21:54+5:302017-11-04T14:24:35+5:30

व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजाचा आक्रोश दाखविण्याचा हा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला आहे़, असे विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले़. पुण्यात व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते़ 

Cartoon exhibition inaugurated in Pune by manikrao thackeray | नोटबंदीचे दुष्परिणाम देश भोगतोय : माणिकराव ठाकरे; व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे पुण्यात उद्घाटन

नोटबंदीचे दुष्परिणाम देश भोगतोय : माणिकराव ठाकरे; व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे पुण्यात उद्घाटन

googlenewsNext
ठळक मुद्देनोटबंदी एक आर्थिक भुकंप : माणिकराव ठाकरे बाळासाहेब ठाकरे कलादालनात व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे : देशाला मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ नोटबंदी एक आर्थिक भुकंप आहे़ या नोटबंदीमुळे विकासदरामध्ये २ टक्क्यांने घट झाली़ विविध विषयांवर रेखाटलेल्या व संकलित केलेल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजाचा आक्रोश दाखविण्याचा हा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला आहे़, असे विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सांगितले़ 
प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड़ अभय छाजेड यांनी बाळासाहेब ठाकरे कलादालनात आयोजित केलेल्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते़ 
ठाकरे म्हणाले, समाजाच्या संवेदना व आक्रोश पोहचविण्यासाठी व्यंगचित्र अत्यंत प्रभावी माध्यम आहे़ नोटबंदीच्या काळामध्ये अनेक नागरिक मृत्यमुखी पडले़ बँकांच्या बाहेर नोटा बदलण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या़ देशात १५ लाख लोक बेरोजगार झाले आहेत़ शेतकरी- शेतमजूर हवालदिल झाला आहे़ लघुउद्योग व मध्यम उद्योगांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ असंघटीत क्षेत्रामध्ये लाखो लोकांच्या नोकर्‍या गेलेल्या आहेत़ मोदी सरकारच्या नोटबंदी वर्षपूर्तीच्या निषेधार्थ ८ नोव्हेंबरला काँग्रेस पक्षातर्फे देशव्यापी काळा दिवस पाळला जाणार आहे़ जनतेचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे़ 
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ़ विश्वजीत कदम, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश एनएसयुआयचे अध्यक्ष अमीर शेख, श्रीकांत शिरोळे, रशिद खान, संजय बालगुडे, रोहित टिळक, रशिद शेख, सदानंद शेट्टी, डॉ़ सतिश देसाई, शिवाजी केदारी, रमेश अय्यर, शानी नौशाद, मुकारी अलगुडे, हाजी नदाफ, महिला काँग्रेस अध्यक्षा सोनाली मारणे, युवक अध्यक्ष विकास लांडगे, नगरसेवक रवींद्र धंगेकर, अजित दरेकर, अविनाश बागवे, लता राजगुरु, सुजाता शेट्टी, नुरुद्दीन सोमजी, दीपक रामनानी, जयकुमार ठोंबरे, राहुल तायडे, राजेंद्र पेशने, देविदास मगर आदी उपस्थित होते़ 

Web Title: Cartoon exhibition inaugurated in Pune by manikrao thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.