शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ठाण्यातील व्यंगचित्रकार संमेलनानिमित्त कार्टूनिस्ट कंबाईनच्या वतीने व्यंगचित्र स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 15:52 IST

दि. २० आणि २१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या मराठी व्यंगचित्रकार संमेलन २०१८साठी कार्टूनिस्ट्स कंबाईनच्यावतीने नवोदितांची व्यंगचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविषय : नेत्यांची वाढदिवस जाहिरातबाजी, टीव्ही मालिकांचा धुडगूस, जीवन व्यापलंय व्हॉट्स अ‍ॅपनेएका स्पर्धकाने पाठवावीत फक्त एक किंवा दोनच व्यंगचित्रे

पुणे : ठाणे येथे दि. २० आणि २१ जानेवारी दरम्यान  होणाऱ्या मराठी व्यंगचित्रकार संमेलन २०१८साठी कार्टूनिस्ट्स कंबाईनच्यावतीने नवोदितांची व्यंगचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी  महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, हैदराबाद आदी ठिकाणांवरून नवोदित चित्रकार, अव्यावसायिक व्यंगचित्रकार, व्यंगचित्रकार नसलेल्या व्यक्तींकडून मराठी व्यंगचित्रे मागवण्यात आली आहेत.व्यंगचित्र स्पर्धेसाठी नेत्यांची वाढदिवस जाहिरातबाजी, टीव्ही मालिकांचा धुडगूस, जीवन व्यापलंय व्हॉट्स अ‍ॅपने हे विषय देण्यात आले आहेत. व्यंगचित्रे स्वरचितच असावी, एका स्पर्धकाने फक्त एक किंवा दोनच व्यंगचित्रे पाठवावीत. व्यंगचित्रांचा आकार ए फोर किंवा ए थ्री व फॉरमॅट जेपीजी किंवा टीफ्फ फाईल स्वरूपात असावा. निवड समिती व्यंगचित्राची निवड करेल. स्पर्धकाने स्वत: चा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, इ-मेल पत्ता आणि व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक (असल्यास) चित्रासोबत कळवावा. ई-मेल ऐवजी मूळ व्यंगचित्रे पोस्टाने पाठविताना पाकिटावर ‘व्यंगचित्र स्पर्धा’ असा स्पष्ट उल्लेख असावा. व्यंगचित्रे फक्त पोस्ट अथवा मेलवर पाठवावी. व्हाट्सअ‍ॅपवर पाठवलेली व्यंगचित्रे ग्राह्य धरली जाणार नाही. प्रस्थापित व्यंगचित्रकारांना या स्पर्धेसाठी भाग घेता येणार नाही. व्यंगचित्रे स्वीकारण्याची अंतिम तारीख ७ जानेवारी २०१८ आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. स्पर्धकांनी कार्टूनिस्ट्स कंबाईन, बी-४, कल्पतरु, रश्मी कॉम्प्लेक्स, मेंटल हॉस्पीटल रोड, ठाणे (पश्चिम) ४०००६०४ (मो. : ९८२१७३९३२७) अथवा cc18thane@gmail.com या पत्यावर व्यंगचित्रे पाठवावीत. अधिक माहितीसाठी महेंद्र भावसार  ७०२१९६७५८७ किंवा रवींद्र बाळापुरे ७५०७३२९७२१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Cartoonistव्यंगचित्रकारthaneठाणेPuneपुणे