स्वच्छतागृह गेले वाहून

By Admin | Updated: June 6, 2015 22:00 IST2015-06-06T22:00:10+5:302015-06-06T22:00:10+5:30

कुरकुंभ (ता. दौंड) येथील मुख्य चौकात असणारे स्वच्छतागृह शुक्रवारी (दि. ५) रात्री झालेल्या पावसात वाहून गेले. यामुळे आधिच नादुरूस्त असलेल्या या स्वच्छतागृहाची आणखीनच दुरवस्था झाली आहे.

Carry the sanitation house | स्वच्छतागृह गेले वाहून

स्वच्छतागृह गेले वाहून

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील मुख्य चौकात असणारे स्वच्छतागृह शुक्रवारी (दि. ५) रात्री झालेल्या पावसात वाहून गेले. यामुळे आधिच नादुरूस्त असलेल्या या स्वच्छतागृहाची आणखीनच दुरवस्था झाली आहे.
कुरकुंभ चौकातील परिसरात काही दिवसांपूर्वी सार्वजनिक स्वच्छेतेसाठी आयत्या स्वरूपातील शौचालये ठेवण्यात आली होती; मात्र सुरुवातीपासून या स्वच्छतागृहाच्या जागेवरून गावात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे फक्त प्रायोगिक तत्त्वावर विविध ठिकाणी ही स्वच्छतागृहे ठेवण्यात आली होती. मात्र याचा उपयोग सुरू झाला नव्हता अशी स्वच्छतागृहे नागरिकांनी ढकलून दिली होती. त्यामुळे कुरकुंभ चौकात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला होता.
शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने हे स्वच्छतागृह वाहत जाऊन जवळच असणाऱ्या नाल्यात पडले. परिणामी पाण्याचा प्रवाह पूर्णत: बंद झाला; मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे वाहतुकीवर याचा प्रत्यक्ष परिणाम दिसून आला नाही.
कुरकुंभ चौकातील पुणे-सोलापूर महामार्गावरील भराव पुलामुळे रस्ता रुंद झाला. परिणामी येथील सर्व हॉटेल, दुकाने मोठ्या प्रमाणात स्थलांतरित करण्यात आली त्यामुळे येथील चौकात चारही बाजूने दुकाने झाल्यामुळे चौकातील असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला. कुरकुंभ ग्रामपंचायतीमार्फत बऱ्याच कालावधीनंतर उपाय म्हणून आयत्या स्वच्छतागृहांची संकल्पना पुढे आली. मात्र याला प्रतिसाद मिळाला नाही. स्वच्छतागृहाची खरेदी होऊन बऱ्याच महिन्यांनतंर ती बसवण्यात आलेली नव्हती. मात्र याचा उपयोग सुरू होण्याआधीच ते खराब झाले आहेत.

Web Title: Carry the sanitation house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.