पाटस येथे कारला आग

By Admin | Updated: February 16, 2017 02:59 IST2017-02-16T02:59:58+5:302017-02-16T02:59:58+5:30

पाटस (ता. दौंड ) येथील टोलनाक्याजवळ लोगोन कारला अचानक आग लागली. सुदैवाने ट्रॅफिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढचा अनर्थ टळला.

Carla fire at Patas | पाटस येथे कारला आग

पाटस येथे कारला आग

पाटस : पाटस (ता. दौंड ) येथील टोलनाक्याजवळ लोगोन कारला अचानक आग लागली. सुदैवाने ट्रॅफिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढचा अनर्थ टळला. सोलापूरकडून पुण्याकडे जाणारी लोगोन कार (एम एच ४२ एच ६२६२) पाटस टोलनाक्याजवळ सायंकाळी ७ च्या सुमारास आली. कारमधील प्रवासी अंत्यविधीसाठी निघाले होते.
दरम्यान, कारमधून धूर येत असल्याचे ट्रॅफिक पोलीस प्रदीप कुदळे यांनी पाहिले तेव्हा कुदळे यांनी तातडीने ही माहिती कारचालकाला कळविली. तेव्हा कारचालक आणि अन्य दोन प्रवासी तातडीने कारमधून खाली उतरले. त्यानंतर कारच्या इंजिनने पेट घेतला. तातडीने कुरकुंभ एमआयडीसीतील अग्निशामक बंब बोलविण्यात आला. त्यानंतर एक तासाने आग विझली.

Web Title: Carla fire at Patas