शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणे दुचाकी चालविणा-या तरुणीला तुरुंगवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 12:37 IST

एका चोवीस वर्षीय तरुणीने निष्काळजीपणे गाडी चालविताना ५० वर्षाच्या व्यक्तीला धडक देत जखमी व्यक्तीला मदत करण्याऐवजी त्यांना मारहाण करत खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील दिली.

ठळक मुद्देजखमी व्यक्तीला मारहाण, छेडखानीचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी तर समाजात चुकीचा संदेश जाईल

पुणे : निष्काळजीपणे दुचाकी चालवून धडक देत एका ५० वर्षीय व्यक्तीला जखमी करणा-या तरुणीला १ महिना तुरुंगवास आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. दंड न भरल्यास अतिरिक्त सात दिवस कारावास भोगावा लागेल. दंडाची रक्कम अपघातातील जखमींना देण्यात यावी, असेही आदेशात नमुद केले आहे.   वर्तिका प्रभाकर मिश्रा (वय २४, रा. वडगावशेरी) असे शिक्षा झालेल्या तरुणीचे नाव आहे. विवेकानंद रामानंद थुल (वय ५0,रा. वडगावशेरी) हे धडकेत जखमी झाले होते. त्याबाबत त्यांनी चंदननगर पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना १७ जुलै २०१५ रोजी वडगाव शेरी येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. थुल भाजी मंडई वडगावशेरी येथून कटींग करून चालले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. मिश्रा ही गाडी चालवत होती. या धडकेमुळे थुल व मिश्रा हे दोघे पण पडले. त्यावेळी मिश्रा हिने उठून थुल यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. तसेच तुम्हाला काय करायचे ते करा, माझे वडील वकील आहेत. काही केल्यास तुमच्या विरूध्द छेडखानीचा गुन्हा दाखल करेन अशी धमकीही तिने दिली व निघून गेली. त्यानंतर थुल यांनी मुलाला बोलावून घेतले. त्याने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले. थुल यांनी दुचाकीच्या क्रमांकाच्या आधारे पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणात सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार आर.एन.कांबळे यांनी मदत केली. दंड न भरल्यास अतिरिक्त सात दिवस कारावास भोगावा लागेल. दंडाची रक्कम अपघातातील जखमींना देण्यात यावी, असेही आदेशात नमुद केले आहे. ...........................

तर समाजात चुकीचा संदेश जाईल :  वर्तिका हिचा हा पहिलाच गुन्हा असून ती शिक्षण घेत आहे. त्यामुळे सुशिक्षित कुटुंबातील असल्याने तिला परीविक्षा अधिनियमातील तुरतुदीनुसार चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सोडण्याची मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली. त्यास अ‍ॅड. कोळी यांनी विरोध करत अपघातात जखमी व्यक्तीला मदत करणे अपेक्षित आहे. परंतु तसे न करता अपघातग्रस्त व्यक्तीला मारहाण केलेल्या व्यक्तीला परीविक्षा अधिनियमाचा लाभ देणे योग्य ठरणार नाही. त्यातून समाजात चुकीचा संदेश जाईल, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. दुस-या बाजूने तरुणीचा पहिलाच गुन्हा असून, ती शिक्षण घेत आहे. याचा विचार करून शिक्षा सुनावण्यात आल्याचे निष्कर्षात नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातCourtन्यायालय