शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव मोटारीची दुचाकींना धडक, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:22 IST

एक ठार : पुणे-नाशिक महामार्गावरील घटना

मंचर : आंबेगाव तालुक्यातील पुणे-नाशिक रस्त्यावरील पेठ येथे भरधाव वेगातील इनोव्हा कारने दोन दुचाकींना उडवले. या अपघात दुचाकींवरील एक जण ठार, तर दोघे जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. २) सायंकाळी ४ वाजता घडली. प्रफुल्ल उत्तम शिंदे (वय २६, रा.पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. जखमींवर मंचर येथील रिद्धी सिद्धी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : पेठ बायपासनजीक असणाऱ्या रानवारा पेट्रोलपंपावरून (एमएच १४ बीएल ६०६७) या दुचाकीवरून विशाल कराठे (वय १८) आणि त्याच्या पाठीमागे बसलेला अरुण धुमाळ (वय ४८) हे पेठ गावाकडे जात होते. या वेळी पुण्याकडे जाणाºया (एमएच ३९ व्ही ५०५५) या इनोव्हा कारने दुचाकीला धडक दिली. अपघात करून इनोव्हा कारचालक इनोव्हा गाडीसह पळून गेला. पुढे पेठ गावच्या बायपासवरून यूटर्न करून इनोव्हा चालक भांबावलेल्या अवस्थेत रस्त्याच्या दुसºया बाजूने मंचरच्या दिशेने माघारी येत असताना दुसºया दुचाकीला (एमएच १४ एए २५४७) धडकला. त्यात प्रफुल्ल उत्तम शिंदे (वय २६, रा.पेठ) जागीच ठार झाला.या अपघातातील इतर जखमींवर मंचर येथील रिद्धी सिद्धी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. या अपघातातील इनोव्हाचा चालक पळून गेला आहे. मंचर पोलीस इनोव्हा कारचालकाचा शोध घेत असून, कारचालका विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे