कारची काच फोडणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:08 IST2020-12-02T04:08:51+5:302020-12-02T04:08:51+5:30
पुणे : कारचालकाच्या पुढे दोन कार आडव्या घालून त्यांना राॅडने मारहाण करुन कारची काच फोडण्याचा प्रकार कात्रज बायपासवर घडला. ...

कारची काच फोडणाऱ्यास अटक
पुणे : कारचालकाच्या पुढे दोन कार आडव्या घालून त्यांना राॅडने मारहाण करुन कारची काच फोडण्याचा प्रकार कात्रज बायपासवर घडला.
याप्रकरणी रोणीत वाघ (वय २८, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आकाश विनोद शिरोळे (वय २२, रा. दत्तनगर, गवळीवाडा, आंबेगाव खुर्द) याला अटक केली आहे. त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.
वाघ हे सातारा ते मुंबई या महामार्गावरुन जात असताना कात्रज येथील पुलावर आकाश शिरोळे व त्याच्या साथीदारांनी त्यांच्या कारच्या पुढे कार आडवी घालून त्यांना थांबविले. हातातील रॉडने कारच्या पुढील काचेवर मारुन काच फोडून नुकसान केले व फिर्यादी यांना शिवीगाळ केली.